नियमित कर्ज फेडणार्‍यांना जिल्हा बँकेकडून दिलासा

शेतकरी सभासदांनी आपली हमीपत्र संबंधीत सेवा सहकारी संस्था व शाखेस सादर करून त्यांनी आपले वसुल व्याज परत घ्यावे – शिवाजीराव कर्डीले


युवावार्ता (प्रतिनिधी)
अहमदनगर- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद प्राथमिक वि.का. सेवा सहकारी संस्थांनी ज्या पिक कर्जदार सभासदांकडील नियमित पिक कर्ज परतफेड करणार्‍या सभासदाकडील रू. 3.00 लाखापर्यतचे कर्जावरील दिनांक 01/03/2024 ते दि.31/3/2024 पर्यंत वसुल केलेले व शासनाच्या व्याज परताव्याच्या धोरणा प्रमाणे सन 2023-2024 चे व्याज परताव्यास पात्र असलेले कर्जदार शेतकरी सभासदांना परत करण्याचा बँकेने निर्णय घेतला होता त्या पध्दतीने जिल्हयातील बहुतांश कर्जदार शेतकरी सभासदांना वसुल व्याज बँकेने परत केले असुन आता शेतकर्‍यांच्या मागणीनुसार दिनांक 1 एप्रिल 2023 ते दि.31 मार्च 2024 पर्यंत पिक कर्ज वसुल व्याजही कर्जदार शेतकर्‍यांना परत करण्याचा महत्वपुर्ण निर्णय जिल्हा बँकेच्या कार्यकारी कमिटीचे सभेत घेण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी दिली.
बँकेने दिनांक 1/3/2024 ते दि.31/3/2024 पर्यंतचे पिक कर्ज वसुल व्याज परत पिक कर्जदार शेतकरी सभासदांना देण्याचे निर्णयानुसार जिल्ह्यातील 154840 शेतकर्‍यांना रक्कम रू.73 कोटी 85 लाख रक्कम संबंधीत सोसायटीच्या करंट खाती बँकेने जमा केली आहे.त्यापैकी 74391 सभासदांचे सेव्हिंग्ज खाती रक्कम रू 37 कोटी 61 लाख वसुल व्याज जमा केले आहे. उर्वरीत शेतकरी सभासदांनी आपली हमीपत्र संबंधीत सेवा सहकारी संस्था व शाखेस सादर करून त्यांनी आपले वसुल व्याज परत घ्यावे असे आवाहन बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी केले.
1 एप्रिल 2023 पासुन पिक कर्ज वसुल व्याज परत करण्याच्या निर्णयामुळे जिल्हयातील कोणताही शेतकरी यापासुन वंचित राहाणार नसुन जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटयांनी आता 1 एप्रिल 2023 पासुनचे वसुल पिक कर्जावरील वसुल व्याज परत करण्याचे प्रस्ताव सोसायट्यांनी बँकेच्या संलग्न शाखेत त्वरीत सादर करून शेतकरी सभासदांचे वसुल व्याज लवकरात लवकर व्याज परत करण्याच्या दृष्टीने सोसायट्यांनी अंमलबजावणी करावी. बँकेने जिल्हयातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी मार्फत शेतकर्‍यांना खरीप हंगामाकरीता 179990 शेतकरी सभासदांना रू. 1380 कोटी 56 लाखाचे नविन पिक कर्ज वाटप केले असुन बँकेकडून शेतकर्‍यांना त्वरीत कर्ज वाटपाचे कामकाज सुरू केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख