महामार्गावर दोनवाहनांचा विचित्र अपघात

एयरबॅग उघडल्याने जीवितहानी टळली

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – नाशिक-पुणे महामार्गावरील अकोले पुलावर दोन वाहनांचा विचित्र अपघात झाला. नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार दुभाजक तोडून थेट विरोधी दिशेला गेली. त्यामुळे समोरून आलेल्या एक गाडी या कारवर आदळल्याने हा अपघात घडला. तर एक गाडी थोडक्यात वाचली. कारमधील एयरबॅग उघडल्याने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हा अपघात आज 1.30 वाजेच्या सुमारास घडला. कार क्र. एमएच 19 सीव्ही 5680 ही नाशिकच्या दिशेने येत असतांना अचानक चालकाचा ताबा सुटून या कारने दुभाजकावरून विरूद्ध दिशेला पलटी मारली. त्यामुळे हा भीषण अपघात घडला. तर नाशिक पुणे महामार्गावर टोल नाक्याजवळ एक अपघात घडला असून त्यात 5 – 6 जण जखमी झाले आहेत. या जखमींवर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख