आशिया चषक भरवण्यास श्रीलंका असमर्थ ; पर्यायी आयोजक म्हणून युएई कडे लक्ष

ऑगस्ट महिन्यामध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धा ही श्रीलंकेत खेळवण्यात येणार होती. पण ही स्पर्धा खेळवण्यात आम्ही असमर्थ आहोत, असे श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे
ऑगस्ट महिन्यात आशिया चषक स्पर्धा खेळवण्यासाठी श्रीलंकेने पुढाकार घेतला होता. पण श्रीलंकेमध्ये आता राजकीय अस्थिरता आहे, त्याचबरोबर देशामध्ये आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे आता ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्ही सध्याच्या घडीला तर असमर्थ आहोत, असे श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ही स्पर्धा श्रीलंकेत होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता ही स्पर्धा खेळण्यासाठी एक देश पुढे सरसावला आहे, अशी माहिती मिळत आहे.

आशिया चषक खेळवण्यासाठी सध्याच्या घडीला युएई उत्सुक असल्याचे दिसत आहे. या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी प्रथम पाकिस्तानची निवड करण्यात आली होती. पण आपण पाकिस्तामध्ये क्रिकेट खेळण्यास जाणार नाही, अशी भूमिका भारताने घेतली होती. त्यानंतर या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडे सोपवण्यात आले होते. पण आता श्रीलंकेत राजकीय आणि आर्थिक संकट आहे, त्यामुळी स्पर्धा आता श्रीलंकेत होणार नाही. त्यामुुळे आता युएईचा एक चांगला पर्याय सर्वांसमोर आहे.

युएईने गेल्या दोन वर्षांमध्ये महत्वाच्या स्पर्धा भरवल्या आहेत. भारतामध्ये आयपीएल रद्द करावे लागले होते, त्यानंतर ते युएईमध्येच खेळवण्यात आले होते. त्याचबरोबर ट्वेन्टी-२० विश्वचषकासारखी महत्वाची स्पर्धाही युएईमध्ये खेळवली गेली होती. त्यामुळे सध्याच्या घडीला युएईचा नावाचा विचार पहिल्यांदा केला जाऊ शकतो. पण युएईबरोबरच ही स्पर्धा बांगलादेशमध्येही खेळवली जाऊ शकते. कारण बरेच दिवस बांगलादेशमध्ये मोठी स्पर्धा झालेली नाही आणि त्याचबरोबर बांगलादेशमध्ये कमी वेळामध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. त्यामुळे बांगलादेश हादेखील आशिया चषकासाठी चांगला पर्याय असू शकतो. त्यामुळे आता ही स्पर्धा नेमकी कुठे खेळवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख