भंडारदरा धरणाने गाठला तळ

पाणलोटातच पाणी टंचाईचे संकट

युवावार्ता (प्रतिनिधी)
राजूर –
भंडारदरा परिसरात मान्सून दाखल झाला असला तरी भंडारदरा धरणाच्या पाणलोटात अद्यापही मान्सून दाखल झाला नसल्याने भंडारदरा धरणाचा पाणी साठा स्थिर असून धरणामध्ये केवळ 10 टक्के पाणी साठा शिल्लक आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे अति महत्त्वाचे धरण समजले जाते. याच धरणाच्या पाण्यावर उत्तर नगर जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम झाली आहे. यावर्षी जायकवाडी धरणासाठी भंडारदरा धरणातून पाणी झेपावले गेल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठा अगदी तळाला गेला आहे. आताच्या परिस्थितीमध्ये भंडारदरा धरणामध्ये फक्त 1111 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप जोरदार पाऊस दाखल न झाल्याने नवीन पाण्याची आवक होण्यास अजूनही काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात काल बुधवारी (दि.12) सलग तिसर्‍या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. घाटघर व रतनवाडी येथे मंगळवारी दुपारी तीन ते सहा वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याची माहिती उपलब्ध होत असून भंडारदरा धरणाच्या शाखेकडून पाऊस किती पडला याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र सतत तीन तास कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाण्यासाठी काही प्रमाणात वाढ झाली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भात पिकास रोपे टाकण्यास पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे .

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख