धूळ, चिखल, खड्डे हीच संगमनेर शहराची मुख्यपिडा
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सध्या संगमनेर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत लाजिरवाणी झालेली असून ही धोकादायक परिस्थिती नागरिकांच्या जीवाशी खेरल करणारी आहे. संगमनेर नगरपालिका प्रशासनाने कोणत्याही गंभीर घटनेची वाट ण बघता स्वतः पुढाकार घेऊन तातडीने आणि दर्जेदार व टिकाऊ दुरुस्ती करावी अशी मागणी पुरोहित प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की मागील काही महिन्यांपासून शहरातील अनेक रस्ते कोणतेही व्यवस्थित नियोजन न करता खोदून ठेवले आहेत. इथला कारभार किती गलथानपणाचा आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकतेच सिमेंट काँक्रिटचे बनविण्यात आलेले रस्ते पुन्हा तोडून फोडून गटारीचे पाईप टाकले जात आहेत. अगोदरच सिमेंटचे रस्ते अतिशय हलक्या दर्जाचे केले गेले होते. ते पुन्हा फोडून विसरून राहून गेलेले गटार काम चालू करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. कित्येक रस्ते वाहतुकी साठी बंद ठेवण्यात आले होते. रटाळ पद्धतीने कामे सुरु असल्याने गावभर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळा तोंडावर आलेला आहे. सर्व रस्ते गचाळ आणि खड्डे धारक झाल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. केवळ ठेकेदारांवर नगरपालिका सोपवून अधिकारी नामानिराळे राहात आहेत. कामांची गुणवत्ता अजिबात तपासली जात नाही. खराब रस्त्यांचे पाप मात्र शहरातील लोकांना भोगावे लागत आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत न बघता पावसाला सुरुवात होण्यआधी तातडीने सर्व रस्ते नीट करण्यात यावेत अन्यथा पालिकेच्या समोर धरणे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा जाखडी यांनी पत्रकात शेवटी दिला आह