पर्यटन परिसरात मद्यपानासही बंदी
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या अखेरीस रात्रीच्या कळोखात अंधारात सुरू होणारी काजव्याची चमचम पाहणयासाठी कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात हजारो पर्यटक येतात. पण या काळात अनेकदा पर्यटकांकडून काजव्यांना जवळून पाहण्याचा व कधीकधी हाताळण्याचा मोह होतो. परिणामी झाडावरून हवेत फिरणारे हे किटक पर्यटक पकडण्याचाही प्रयत्न होतात. यातूनच हे किटक मरण्याचे दुष्परिणाम समोर येतात. काही तरुणाईच्या बेशिस्त वर्तनातून वाहतूक कोडी होते. नाहक वाद निर्माण होऊन वातावरण तणावपूर्ण वळणावर येऊन पोहोचते. वन्यजीव विभागाकडून अशा अनेक समस्यांवर उपाय शोधत पर्यटकांसाठी काही नियमावली तयार करण्यात आली. त्यात प्रामुख्याने कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजवोत्सवाच्या कालावधीत रात्री 9 वाजल्यानंतर प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
अकोले तालुक्यातील कळसूबाई, बारी, रंधा फॉल, घाटघर, उडदावणे, सांम्रद यांसह भंडारदरा धरणाच्या पाणलोटात क्षेत्रातून लवकरच पर्यटकांना भूरळ टाकणारी नेत्रसुखद काजव्यांची चमचम बधावयास मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर येथील वन्यजीव विभाग, स्थानिक पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत व विविध गावच्या ग्रामस्थांची एक संयुक्त बैठक काजवा महोत्सवाच्या पूर्व तयारीसाठी पार पडली. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात दरवर्षी 25 मे 15 जूनच्या दरम्यान काजव्यांची चमचम बधावयास मिळते. काजव्यांचा हा सुखद करिष्मा बघण्यासाठी दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येत अभयारण्यात येतात. यावर्षी पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संभाव्य गर्दीवर नियत्रंण ठेवण्यासाठी वन विभागाकडून पर्यटकांवर काही बंधने घालण्यात आली आहेत. शेंडी येथील कन्यजीव विभागाच्या विश्रामगृहावर काजवा महोत्सव निर्विघ्न पार पाडण्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. त्यात नियमावली तयार करण्यात आली. पर्यटकांना काजवे पाहणीतून मनमुराद आनंद घेता यावा म्हणून काही निबंध घातली आहेत. यात अभयारण्यात रात्री 9 वाजल्यानंतर नंतर प्रवेशबंदी करण्यात आली. आढावा बैठकीस राजूर पोलिस ठाण्याचे सहाव्यक निरीक्षक दिपक सरोदे, वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, वनपाल शंकर लांडे, भास्कर मुठे, परिसरातील हॉटेल व टेंट व्यावसायिक व वन्यजीव विभागाचे कर्मचारी हजर होते. काजवा वाचला, तरच काजवा महोत्सव वाचेल, महणून आढावा बैठकीत काजवा वाचवण्याचे आवाहन करण्यात आले. कळसूबाई अभयारण्य क्षेत्रांतील काजवे पाहण्यासाठी पर्यटकांना प्रवेश शुल्क आकारुन रात्री 9 वाजेपर्यंतच परवानगी निश्चित करण्यात आली, अभयारण्यात या कालावधीत ठिकठिकाणाहून तयार करण्यात येणार्या वाहनतळावरच वाहनांची पाकींग बंधनकारक राहील. रात्री दहा वाजल्यानंतर अभयारण्यात वाद्य वाजवण्यास बंदी घालण्यात आली. या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात येईल, पर्यटकांनी काजवा महोत्सवाची अनुभव शांततेत व आनंदात घ्यावा, असे आवाहन पोलीस व वन्यजीव अधिकारी व वन कर्मचार्यांनी केल