थैलेसेमिया आजाराने ग्रस्त असलेल्या नमितला मदतीची गरज

छोटीशी मदत नमितच्या उद्याच्या आशेच्या किरणासाठी


संगमनेर
अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या चिमुरड्या नमित फटांगरेला थैलेसिनिया या आजाराने ग्रासले आहे. या आजारावरील खर्च महागडा असल्याने आपली मदतच अमोलच्या पुढील निरोगी जीवनासाठी सार्थकी ठरेल. यासाठी त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन सामाजिक संघटनांनी केले आहे. अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या नमित अमोल फटांगरे या बालकाला थैलेसेनिया (मेजर) या आजाराने ग्रासले आहे. त्याला दर पंधरा दिवसाला रक्त भरावे लागते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नमितला बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन करणे आवश्यक आहे. या ऑपरेशनचा खर्च हा १४ लाख रुपये इतका आहे. मात्र नमितचे वडील तालुक्यातील सारोळे पठार येथील अमोल रामनाथ फटांगरे यांची आर्थिक परिस्थिती बेताची आणि नाजूक आहे.

त्यातच नमित वरील ऑपरेशन खर्चाची रक्कम खूप मोठी आहे व ऑपरेशन करणे नमितसाठी अत्यावश्यक आहे. त्याचे बेंगलोर येथील वसंत नगर भागातील भगवान महावीर
जैन हॉस्पिटल येथे ऑपरेशन होणार आहे. यासाठी नमितला दीर्घायुष्य लाभावे व तो सुखा सुखी या दुर्धर आजारातून बरा व्हावा यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी, सामाजिक संघटनांनी, छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी, दानशूर व्यक्तींनी खारीचा वाटा उचलून नमितला भावी आयुष्यासाठी मदतीचा हात देऊन छोटीशी मदत नमित या उद्याच्या आशेच्या किरणासाठी द्यावी. यासाठी ९९७५४१४४७७, ९५५२९६४९७४ किंवा हॉस्पिटल संपर्क ०८०४०८७५५५५/०० येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख