तिघे ताब्यात, सहा जण फरार
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर चोरांच्या टोळ्या सक्रिय आहे. अनेक ठिकाणी या चोरट्यांनी धाडसी चोर्या करून लाखोंचा ऐवज लुटून नेला आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भिती असतांना आश्वी पोलीस पथकाने शुक्रवारी मध्य रात्री पानोडी ते वरवंडी घाटात धाडसी कारवाई करत चोरट्यांची टोळीचा पाठलाग करत तीन चोरट्यांना जेरबंद केले. तर यावेळी अंधाराचा फायदा घेऊन सहा चोरटे पसार झाले. चोरट्यांकडून चार लाख रूपये किंमतीची चारचाकी गाडी जप्त करण्यात आली अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
आश्वी पोलीस ठाणे हद्दीत पानोडी ते वरवंडी घाट परिसरात चोरटे दबा धरून बसत असून रात्री प्रवाश्यांची लुट करत असल्याच्या अनेक तक्रारी आश्वी पोलीसांकडून आल्या होत्या. दरम्यान रात्री 112 क्रमांकावर एक इसमाचा माहिती देणारा कॉल पोलीसांना आला. त्यात सांगितले की, वरवंडी घाटात काही इसम दरोड्याच्या इराद्याने उभे असून त्यांच्याकडे लोखंडी कटावणी, कुर्हाड, लाकडी दांडके, लोखंडी रॉड, दोरी, मिरची पावडर असे साहित्य घेऊन दरोड्याच्या इराद्याने उभे आहे. या कॉलची दखल घेत आश्वी पोलीसांनी पानोडी ते वरवंडी घाटात धाव घेत एक सफेद रंगाची जितो महिंद्रा कार क्रमांक एमएच 17, सीव्ही 1084 उभी होती. यात 9 जण चोरटे दरोड्याच्या तयारीत असतांना आश्वी पोलीस पथकाने त्यांच्यावर झडप मारली.
यावेळी तीन चोरट्यांना पकडण्यात पोलीसांना यश आले तर सहा चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. याप्रकरणी अकाश सुनिल पाळंदे, रोहित भिरू मुळेकर, (रा. दाढ बु, ता. राहाता) सिद्धु मकवाने (रा. दाढ बु,) कादिर (पुर्ण नाव माहित नाही) (रा. घुलेवाडी), शरद उर्फ गोट्या हरिभाऊ पर्बत (रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर) व इतर तीन अज्ञात इसम अशा 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आह