सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जम्मू काश्मीर मधील दहशतवाद संपून ते देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तिथे आता मुक्त वातावरणात निवडणूक होईल. मला एक दिवस पंतप्रधान करा, मी काश्मीरवर लादलेले कलम ३७० रद्द करतो, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत. मोदीजींनी हिंमतीने तो निर्णय घेऊन बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली. काही विघ्नसंतोषी मंडळी काश्मीरला पुन्हा वेगळे पाडू इच्छितात. मात्र त्यांचे हे प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याचे सुतोवाच केंद्राने केले आहेच. तो प्रदेश भारतात सामील करुन घेण्याच्या दृष्टीनेही आता प्रयत्न होतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकतेच एका टि्वट द्वारे म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ होत आहे. देशाची राजकीय एकात्मता राखणारे पाऊल पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांनी उचलले होते, ते कोर्टाने आज वैध ठरवले त्या बद्दल मी श्री.मोदी जी आणि गृहमंत्री श्री. अमितभाई शाह जी यांचे अभिनंदन करतो असेही ते यावेळी म्हटले.