अखेर अथक प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद


मालपाणी लॉन्समध्ये पहाटे बिबट्याची भटकंती

सकाळी मालदाड रोड येथे धुमाकूळ
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
शहरालगतच्या ग्रामीण भागात बिबट्याचा वावर व दहशत नित्याचीच झालेली असतांना आता हे बिबटे थेट शहरात मुक्त संचार करतांना दिसत आहे. आज शुक्रवारी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान नाशिक-पुणे महामार्गावरील मालपाणी लॉन्समध्ये बिबट्याने मुक्तपणे भटकंती केली. त्यानंतर सदर बिबट्या मालदाड रोड येथील आदर्श कॉलनी परिसरात धुमाकूळ घालत येथी राहणारे गोरख मानकर यांच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये बिबट्याने आश्रय घेतला. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. या बद्दलची माहिती मिळताच पोलीस व वनविभागाचे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहिम राबविणे सुरू केली असून सदर बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देत अखेर अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले. दरम्यान सदर बिबट्या हा मेडीकव्हर हॉस्पिटल, ढोलेवाडी, रहाणे मळा येथून थेट महामार्गा ओलांडून तिकडे गेला असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.दरम्यान बिबट्याचा हा थरार पहाण्यासाठी मालदाड रोड येथे एकच गर्दी उसळली आहे.


संगमनेर शहरालगत गुंजाळवाडी, सुकेवाडी, घुलेवाडी या परिसरात बिबट्याचा वावर व दर्शन नित्याचेच बनले होते. रात्री किंवा पहाटे घराबाहेर पडणे धोकादायक बनले होते. वनविभागाकडून मात्र कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने बिबट्यांचा मुक्त संचार सुरूच होता. गेल्या काही दिवसांपासून शहरातील मेडिकव्हर हॉस्पिटल परिसरात बिबट्याचे दर्शन होत असतांना वनविभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. हाच बिबट्या आज या परिसरातून रहाणे मळा, गणेश नगर असा प्रवास करत थेट महामार्ग ओलांडून सकाळी मालपाणी लॉन्समध्ये घुसला. बिबट्याची ही कृती काही जणांनी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर यांची माहिती मालपाणी लॉन्स व्यवस्थापनाला देण्यात आली.

त्यांनी येथील सीसीटिव्हीची तपासणी केल्यानंतर बिबट्याचा आतील मुक्तसंचार स्पष्ट दिसून आला. त्याचवेळी नागरीकांनी मोठा गलका केल्याने या बिबट्याने पाठीमागून उडी मारत पद्मानगर मार्गे मालदाड रोडला धाव घेतली. मात्र सकाळी नागरीकांची वर्दळ व काही नागरीकांनी त्याला पाहिल्यानंतर केलेली आरडाओरड यामुळे बिबट्या आदर्श कॉलनीतील गोरख मानकर यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसला. मात्र तेथे तो अडकून बसला. घटनेच्या माहितीनंतर पोलीस व वनविभागाने तात्काळ पिंजरा, भुलीचे इंजेक्शनसह फौज फाटा परिसरात तैनात केला. वनविभाच्या कर्मचार्‍यांनी त्याला दोन इंजेक्शनद्वारे भूल दिली असून अखेर अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख