‘मविआ’उमेदवारांच्या पाठीशी बाळासाहेब खंबीर

काँग्रेसच्या विजयासाठी थोरातांवर मोठी जबाबदारी

शिर्डी – नगरमध्ये थोरातांची यंत्रणा सक्रिय

युवावार्ता संगमनेर (प्रतिनिधी)
देशात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर काँग्रेस पक्ष काहिसा अडचणीत आला. अनेक राज्यातून काँग्रेसची सत्ता गेली. मात्र 2019 मध्ये आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस सत्तेत आली. परंतू कूटनितीने हे सरकार पाडल्या गेल्यानंतर व त्यानंतर झालेल्या अनेक राजकीय घडामोडींनंतर काँग्रेस पक्षाचे अनेक शिलेदार भाजप व इतर पक्षात गेले. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी एकत्रित ठेवणे, सन्मानजनक जागावाटप करणे, लढवय्ये उमेदवार शोधणे व त्यांना निवडूण आणणे अशी मोठी जबाबदारी पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते असल्याने आ. बाळासाहेब थोरातांकडे आली.


काँग्रेस पक्षाच्या 17 सक्षम उमेदवारांची निवड करून अनेक मतदारसंघात काँग्रेसने निवडणूकीत चूरस निर्माण केली. त्याचबरोबर मित्रपक्षाच्या चांगल्या उमेदवारांची निवड केल्याने राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळणार असल्याचे अनेक सर्व्हेतून दिसत आहे. शिर्डीमध्ये मविआचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, त्याचबरोबर दक्षिण नगरचे उमेदवार निलेश लंके यांच्या पाठीशी थोरात यांनी आपली संपूर्ण ताकद उभी केली आहे. संपूर्ण यंत्रणा यांच्यासाठी कामाला लावून आ. थोरात राज्यातील इतर उमेदवारांचे फॉर्म भरण्यासाठी व प्रचारासाठी फिरत आहेत.
शेजारील पुणे, शिरूर, बारामती, सोलापूर, सातारा, कोल्हापूर या मतदारसंघातील महायुतीचे तगडे उमेदवार असणारे रविंद्र धंगेकर, डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदे, शशिकांत शिंदे, छत्रपती शाहू महाराज या उमेदवारांच्या प्रचारासाठी आ. थोरात सक्रिय भूमिका बजावत आहेत. त्याचबरोबर धुळे (शोभा बच्छाव), अमरावती (बळवंत वानखेडे), नांदेड (वसंत चव्हाण), जालना (कल्याण काळे), लातूर (शिवाजीराव काळगे) यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांसाठी आ. बाळासाहेब थोरात स्टार प्रचारक आहेत. निवडणुकीतील बारकावे, राजकीय समीकरणे, धोरण व नियोजन याचा गाढा अभ्यास असणारे आ. थोरात या उमेदवारांसाठी भक्कम आधार ठरत आहेत.
अडचणीच्या काळात आ. थोरातांनी पक्षाला सावरले तर याही वेळेस महाविकास आघाडीच्या दमदार विजयात आ. थोरातांचा वाटा मोलाचा ठरणार आहे. लोकसभेनंतर येणार्‍या विधानसभेसाठी हा विजय काँग्रेससाठी हा विजय संजीवनी देणारा ठरणार असून त्यात थोरातांचे नेतृत्व चमकणार आह

सत्ताधार्‍यांनी वेगवेगळ्या दबावतंत्रांचा वापर करून विरोधी पक्षाला कमजोर करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे अनेक रथी-महारथी पक्षाला सोडून गेले. मात्र आ. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसवर आपली निष्ठा कायम ठेवत काँग्रेसच्या पडत्या काळात पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी या वयातदेखील पायाला भिंगरी लावून राज्यभर दौरा केला. अनेक मॅरेथॉन बैठकीनंतर काँग्रेसला सन्मानकारक 17 जागा मिळवून दिल्या. या 17 जागा आणि सोबतच महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी आ. बाळासाहेब थोरात सक्रिय झाले असून आपली सर्व यंत्रणा त्यांनी कामाला लावली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख