हनुमान जयंतीसाठी संगमनेरकर सज्ज

0
1921

संगमनेरच्या रथ मिरवणुकीला 95 वर्षाची परंपरा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेरच्या हनुमान जन्मोत्सव आणि त्यानिमित्ताने निघणार्‍या रथ मिरवणुकीला 95 वर्षाची मोठी परंपरा लाभली आहे. ऐतिहासीक पंरपरा लाभलेला हनुमान जयंती उत्सवाचे याहीवर्षी संगमनेरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
इंग्रज काळात पोलीसांच्या हुकूमशाहीला झुगारून झुंबराबाई अवसक या महिलेच्या नेतृत्वाखाली हा हनुमान रथ ओढण्यात आला होता. तेंव्हापासून पोलीस आणि हनुमान भक्त यांच्यातील संघर्ष व त्यानंतर पोलीसांना मिळालेला मान असा मोठा ऐतिहासीक वारसा या हनुमान रथाला लाभलेला आहे. मागील वर्षी काही अडचणींमुळे शहर पोलीस निरीक्षकांऐवजी एका महिला पोलीस अधिकार्‍यांच्या हस्ते मानाचा भगवा ध्वज आणून हा रथ ओढण्यात आला होता. तर यावर्षी रूढी परंपरेनुसार भगवा ध्वज शहर पोलीस ठाण्यातून वाजत-गाजत पो. नि. भगवान मथुरे यांच्या हस्ते रथावर फडकविण्यात येणार आहे. दरम्यान सध्या कडक उन्हाळा असून ही मिरवणूक सकाळी लवकर सुरू होणार आहे. या मिरवणूकीच्या स्वागतासाठी संगमनेरकरक सज्ज झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here