सामान्य महिलेचा ब्युटी आणि मेकअप क्षेत्रातील असामान्य प्रवास

कविता डेंगळे यांच्या ऐश्वर्या हेअर ब्युटी स्टुडिओला उदंड प्रतिसाद

लहानपणापासूनच परिस्थितीचा सामना करावा लागला. कधीच कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळाली नाही. खूप कष्ट, अडथळे पार करत अथक प्रयत्नानंतर यश मिळायचे. लग्नानंतर पतीची खंबीर साथ भेटली. पाटील घराणे असल्यामुळे खूप मोठी जबाबदारी होती. करिअरसाठी सौदर्य क्षेत्र निवडले. मोठ्या मेहनतीने ब्युटीशियन आणि मेकअप आटिस्ट म्हणून नाव कमविले मागे वळून बघताना अशक्य वाटणारा प्रवास शक्य झाला, त्याचे अप्रूप वाटते. ही भावना आहे सौ. कविता सुनिल डेमळे यांची.
संगमनेच्या घुलेवाडीतील पावबाकी रोड येथील ऐश्वर्या हेअर ब्युटीच्या त्या संचालिका आहेत. कविता यांच्या माहेरी सामान्य परिस्थिती होती. सहाणे पाटलांच्या घरात त्या 4 बहिणी आणि भाऊ आहे. कविता 9 वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. दुःखाचा मोठा डोंगर कोसळलेला असतानाही आईने स्वतःला सावरले. खडतर परिस्थितीत मुलांचा सांभाळ करत त्यांच्यावर चांगले संस्कार आणि शिक्षण दिले. या काळात आईच्या नातेवाईकांची खूप मदत झाली. कवितांच्या मामाच्या येथे शिक्षण झाले. कविता अभ्यासातही खूप हुशार होत्या. नेहमी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण व्हायच्या. मामांची शेती असल्यामुळे कविताने खूप शेतीची कामे, कष्ट करून आपले शिक्षण पूर्ण केले. नंतर ब्युटी क्षेत्रात करिअर करायचे ठरवले. आधी बेसिक नंतर ऍडव्हान्स नंतर ब्युटी क्षेत्रात पदवी होऊन ब्युटिशिअन ते मेकअप आर्टिस्ट असा प्रवास सुरु झाला. नंतर इलेक्टिशिअन म्हणून असलेल्या सुनिल भास्करराव डेंगळे पाटलांसोबत त्यांचा विवाह झाला. पेशवे सरदार त्रंम्बकजी डेंगळे यांचा वारसा लाभलेल्या निमगाव जाळी येथील डेंगळे पाटील घराण्याच्या त्या सुनबाई झाल्या. कवितातील कला, जिद्द न मेहनत बघून पती सुनीलने कविता यांना साथ दिली. आणि अगदी शून्यातून उभा केलेला व्यवसाय अल्पवधीतच नावारूपाला आला.


मागील 1 ते 8 वर्षात या ब्युटी क्षेत्रात प्रगती करत असतानाच 5 वर्षांपूर्वी कविता आणि सुनिल यांचा भयानक अकॅसिडंट झाला. त्यात कविता यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचा एक पाय मोडला, डोक्यात टाके पडले. खूप जबाबदार्‍या आणि आपल्याला स्वतः चे अस्तित्व निर्माण करायचेच ही सकारात्मक भावनेमुळे 17 दिवसांच्या डिस्चार्ज नंतरही त्यांची आपले ब्रायडल काम आणि क्लासेस वाकर पकडुन चालू ठेवले. कला, जिद्द, मेहनत सकारात्मक विचार न स्वतःवर विश्वास असेल तर आपण अशक्य ही शक्य करू शकतो. असे कविता म्हणतात. ब्युटी क्षेत्रात कलेची आवड असलेल्या सगळ्या महिलांना यांना आर्थिक सक्षम करायचे आहे. म्हणून थोड्या दिवसापूर्वी त्यांनी कविता डेंगळे मेकओव्हर यूट्यूब चॅनेल सुरु केला आहे. त्यातून त्या महिलांनी ब्युटी टिप्स देतात.


कविता यांना निकिता व इशिता या दोन मुली आहेत. ब्युटी प्रोफेशन जेवढे गरजेचे तेवढेच आपली फॅमिलीही तेवढीच महत्वाची आहे. असे कविता म्हणतात. मुलीचे शिक्षण त्यांच्यावर योग्य संस्कार, सासू – सासरे, पतीची कामे, पाहुणे, घरातील सगळे कामे अशा सगळ्यात जबाबदार्‍या त्या आनंदाने पार पडतात. कविता यांचे ब्युटी स्टुडिओ ग्रामीण भागात आहे. आता ग्रामीण भागातील सगळ्यात ब्राईडलला खर्चिक मेकअप करता येत नाही. हीच भावना समजून कविता यांनी अशा नववधूसाठी अगदी अल्पदरात ब्रायडल मेकअप करून देतात. आनंद देण्यात असतो घेण्यात नाही हे कविता फार माणतात व अनुभवतात. याशिवाय कविता आपल्या ब्युटी स्टुडिओतील दोन तीन सहकार्‍यांसोबत वर्षातून एकदा अनाथ आश्रमात जाऊन तेथील मुलामुलींची हेअर कट करून देतात. पैशांनीही मिळणार नाही असा आनंद आणि समाधान यातून मिळते असं कविता मानतात.
कविता यांनी खूप कमी वयात ओढवलेल्या परिस्थिती समोर कधीच हार मानली नाही. उलट आलेल्या संकटाना संकट न समजून त्या संकटातूनही आलेल्या संधीच सोने करण्याचा प्रयत्न केला. कला, जिद्द न मेहनतीच्या जोरावर अगदी शुन्यातून कवितांनी आपले विश्व तयार केले.
असा खडतर प्रवासात हार न मानता ब्युटी क्षेत्रात सगळ्या जबाबदार्‍या घेऊन आपला ठसा उमटणार्‍या आपल्या संगमनेरमधील (निवगाव जाळी) घुलेवाडी, पावबाकी रोड, येथील प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट सौ. कविता सुनिल डेंगळे यांना लोकमतकडून 2023 या ब्युटी आयकॉन पुरस्कार ही मिळाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख