एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य

एन्डोस्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपीसह ईआरसीपी चाचण्यांना सुरुवात

नाशिक क्लिनिकमध्ये बाह्यरुग्ण सेवा
नाशिकमध्ये दर बुधवार आणि शुक्रवारी पोटविकार विभागाची बाह्यरुग्ण सेवा सुरु करण्यात आली आहे. यादरम्यान, पोटासंबंधित आजारांवर सल्ला व मार्गदर्शन केले जाते. यासोबतच अतिशय कमीत दरांत रुग्णांना औषधेदेखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

पोटविकाराची लक्षणे
पोटामध्ये वेदना होणे, गिळायला त्रास होणे, गिळता न येणे, अचानक वजन कमी होणे, भूक कमी लागणे, छातीमध्ये व पोटामध्ये जळजळ होणे, वारंवार अतिसार (डायरिया) होणे,  बद्धकोष्ठता, उलट्या व रक्ताच्या उलट्या होणे, काळी संडास, संडासातून रक्त येणे, कावीळ,  पित्ताशयातील खडे व पित्तनलीकेतील खडे, यकृताचे विकार, स्वादूपिंडाचे विकार,  पोटातील आतड्याला सूज येणे इत्यादी.

आजार अंगावर काढू नका
एसएमबीटी हॉस्पिटलच्या पोटविकार विभागात यकृत रुग्णांमध्ये गळ्याखाली फुगलेल्या नसांवर बॅडिंग करणे, अन्ननलिकेत किंवा पोटामध्ये गिळलेल्या पिन, चुंबक, बॅटरी, काटे व तत्सम गोष्टी पोटातून काढणे, अन्ननलिकेचा अडथळा दूर करणे, अन्ननलिका, पोट, यकृत, स्वादुपिंड, मोठे आतडे यांचा कर्करोग-निदान व उपचार करणे, अन्ननलिका व पोट व आतडे यातून होणारा रक्तस्राव रोखणे, निदान व उपचार, पित्तनलिका व स्वादुपिंडातील खडे व अडथळे  ईआरसीपीद्वारे दूर करणे इत्यादी उपचार केले जात आहेत. आजार अंगावर न काढता तत्काळ उपचार घेतल्यास कुठलाही आजार बरा होतो.
– डॉ. प्रणव आंबर्डेकर, पोटविकार तज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल

गेल्या काही दिवसांपूर्वी पोट व यकृत (लिव्हर) संबंधित आजार असलेल्या रुग्णांना इतरत्र जाऊन उपचार घ्यावे लागत होते. रुग्णसंख्येचा वाढता आलेख यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नुकताच एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ पोटविकार विभाग सुरु करण्यात आला आहे.  याठिकाणी एन्डोस्कोपी, कोलोनोस्कोपी व ईआरसीपी प्रक्रियांना सुरुवात  करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोटविकार विभागाची बाह्यरुग्ण सेवा आठवड्यातून दोन दिवस नाशिक येथील क्लिनिकमध्येही सुरु करण्यात आली असून याठिकाणी रुग्णांना उपचार घेता येणार आहेत. याबाबतची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

इगतपुरी तालुक्यातील धामणगाव-घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये नाशिकसह जळगाव, भुसावळ, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बुलढाणा, जालना, भंडारा गोंदियासोबतच ठाणे, पालघर व मुंबईच्या विविध भागांतून रुग्ण उपचारासाठी येत असतात. याठिकाणी पूर्णवेळ पोटविकार तज्ञ याठिकाणी उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. मात्र, गेल्या महिन्यापासून तज्ञ व अनुभवी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रणव आंबर्डेकर पूर्णवेळ याठिकाणी उपलब्ध झालेले असून पोटावरील वेगवेगळ्या स्कोपीसह क्लिष्ट शस्रक्रिया याठिकाणी ते करू लागले आहेत.

सद्यस्थितीत एसएमबीटीमध्ये अद्ययावत गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपीसह ईआरसीपीद्वारे विना शस्त्रक्रिया पोटासंबंधित आजारांचे निदान व उपचार करणे सहज शक्य झाले आहे. यासोबतच अत्याधुनिक फायब्रोस्कॅन ज्याद्वारे लिव्हरची इजा ओळखता येते ही सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांवर याठिकाणी शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत तर योजनेत न बसणाऱ्या रुग्णांवर याठिकाणी अल्पदरांत उपचार केले जात आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरीटेबल हॉस्पिटल असलेल्या या हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत २५ पेक्षा अधिक स्पेशालिटी आणि सुपरस्पेशालिटी विभाग सुरु झाले आहेत. एसएमबीटी हॉस्पिटलला नुकतेच सर्वोच्च रुग्णसेवेचा मापदंड समजल्या जाणाऱ्या एनएबीएच संस्थेची प्राथमिक मान्यतादेखील मिळाली आहे.  

रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची (लिव्हर ट्रान्सप्लांट) माहिती मिळावी यासाठी डॉ. आंबर्डेकर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दररोज व नाशिक येथील बाह्यरुग्ण विभागात अवयव प्रत्यारोपणावर विशेष मार्गदर्शन करत आहेत. यासोबतच पचनसंस्थेशी निगडित सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे रुग्णांची गैरसोय यामुळे टळलेली आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख