तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध कार्यक्रमांचे आोजन
युवावर्ता (प्रतिनिधी) अकोले –
तालुक्यातील देवठाण येथील काशाई माता देवस्थानची यात्रा सालाबादप्रमाणे यंदाही उत्साहात करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी बैठकीत घेतला. सरपंच निवृत्ती जोरवर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांची व यात्रा समितीची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील प्रत्येक कुटुंबाकडून पाचशे रुपये वर्गणी घेण्याचे ठरवण्यात आले. या वर्गणीमधून लोकनाट्य तमाशा, जंगी कुस्त्यांचा हगामा, चांगला आर्केस्ट्रा आणि बैलगाड्या
शर्यती करण्याचे नियोजन आहे.
यात्रेच्या नियोजनासाठी सरपंच निवृत्ती जोरवर व १७ सदस्य पंच समिती, सेवा सोसायटीचे अध्यक्ष जालिंदर बोडके व १३ सदस्य पंच समिती अशा ३० लोकांची यात्रा समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या नियोजनाच्या बैठकीला अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ऍड. अशोक शेळके, माजी पंचायत समिती माजी सदस्य अरुण शेळके, सद्गुरू कलेक्शनचे संचालक श्रीकांत सहाणे, अमृतसागर सहकारी दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे, अगस्ती कारखान्याचे विद्यमान संचालक सुधीर शेळके, बुवासाहेब नवले पतसंस्थेचे संचालक एकनाथ सहाणे, जनलक्ष्मी सहकारी पतसंस्थेचे संचालक केशव बोडके, उपसरपंच माधव कातोरे, सोसायटीचे उपाध्यक्ष मुरलीधर पथवे आदी उपस्थित होते.