संगमनेर उपविभागात 23 जणांना प्रवेश बंदी

सन-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून कारवाई
24 एप्रिल पर्यंत असणार प्रवेश बंदी

waghchaoure

युवावर्ता (प्रतिनिधी) संगमनेर

सद्यस्थितीत सुरू असणारी लोकसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता व या आचारसंहितेदरम्यान येणारे विविध सण, उत्सव शांततेत पार पाडावे त्याचप्रमाणे आचारसंहिता उल्लंघना संबंधाने कोणताही गैरप्रकार होऊ नये या दृष्टीने संगमनेर पोलीस उपविभागातील संगमनेर शहर पोलीस स्टेशन,संगमनेर तालुका पोलीस स्टेशन व अकोले पोलीस स्टेशन मधून एकूण 46 व्यक्तींना संगमनेर तालुका तसेच अकोले तालुक्याच्या स्थळ सीमा हद्दी मध्ये प्रवेश बंदीचे प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले होते. सदरचे प्रस्ताव सीआरपीसी 144 खाली सादर करण्यात आले होते.


त्यापैकी एकूण 23 व्यक्तींवर आज आज रोजी उपविभागीय अधिकारी संगमनेर यांनी प्रवेश बंदीचे आदेश पारित केले आहेत. आदेशांची बजावणी आज रोजी पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे. उर्वरित 23 प्रस्तावांवर देखील लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.
ज्या व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याचप्रमाणे सामाजिक शांतता भंग करण्यासंबंधाने गुन्हे ज्या व्यक्तींवर दाखल आहेत अशा व्यक्तींवर सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. सुरू असलेली निवडणूक आचारसंहिता याबरोबरच रमजान ईद,तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर सदरची कारवाई करण्यात आली आहे.दि 24/4 पर्यंत सदर व्यक्तींना प्रवेश बंदी लागू करण्यात आलेली आहे. या कालावधीमध्ये या व्यक्ती संगमनेर तालुका किंवा अकोले तालुका हद्दी मध्ये मिळून आल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावे. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील.

यांच्यावर करण्यात आली कारवाई

1) संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर (रा. वेल्हाळे रोड संगमनेर),

2) इस्माईल निसार पठाण (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर)

3) हुजेब शब्बीर शेख (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर)
4)अरबाज करीम शेख (रा. रहेमतनगर संगमनेर),
5) नईम कादर शेख (रा. उज्जत नगर, संगमनेर),
6) शुभम हिरामण शिंदे (रा. शिवाजी नगर, संगमनेर)
7) कासीम असद कुरेशी (रा. भारत नगर, संगमनेर)
8) धीरज राजेंद्र पावडे (रा. इंदिरानगर, संगमनेर)
9) इम्रान उस्मान पठाण(रा. अकोले नाका, संगमनेर),
10) सुहास भाऊसाहेब पुंडे (रा. ढोकरी ता. अकोले),
11) विशाल लक्ष्मण डगळे (रा. खिरविरे ता. अकोले),
12) लक्ष्मण ज्ञानदेव डगळे (रा. खिरविरे ता. अकोले)
13) आण्णासाहेब सुधाकर वाकचौरे (रा. कळस बु. ता. अकोले),
14) दौलत साहेबराव महाले (रा. बेलापूर ता. अकोले)
15) खंडू दादाभाऊ करवर (रा. ढोकरी ता. अकोले)
16) मनोज शिवाजी काकड (रा. जोर्वे ता. संगमनेर)
17) मयूर राधु दिघे (रा. जोर्वे ता. संगमनेर),
18) प्रसाद दिलीप काकड (रा. जोर्वे ता. संगमनेर),
19)कृष्णा विलास इंगळे (रा. जोर्वे ता. संगमनेर),
20) दत्तात्रय संपत थोरात (रा. वडगावपान ता. संगमनेर),
21) सत्यम भाऊसाहेब थोरात (रा. वडगावपान ता. संगमनेर),
22) अब्दुल गफ्फार पठाण (रा. बोटा ता. संगमनेर),
23) मोईन हनीफ कुरेशी (रा. माळवदवाडी ता. संगमनेर),

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख