संतप्त महिलांनी ठोकले ग्रामपंचायतला टाळे


पाणी प्रश्नावरून महिला आक्रमक


युवावार्ता (प्रतिनिधी)
भंडारदरा – पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी कोहंडी येथे लहान मुलांसह संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला काल गुरूवारी (दि.16) टाळे ठोकले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीताताई भांगरे यांना हे समजताच त्यांनी तत्काळ गावात येत गटविकास अधिकार्‍यांशी यांच्याशी संपर्क साधला.
ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणामुळे एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची वणवण आहे. आदिवासी भागातील कोहंडी हे अत्यंत महत्त्वाचे गाव आहे. जवळच एक किलोमीटरवर निळवंडे धरणाचा बॅकवॉटर आहे मात्र आजही पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते.
कोहंडी येथील ग्रामस्थांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागते. असे येथील महिलांचे म्हणणे आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील आदिवासी भागातील ही सत्य परिस्थिती पाहताना पुढारी आणि अधिकार्‍यांच्या संवेदना जातात कुठे हे समजत नाही? असा संतप्त सवाल महिला करत होत्या. आम्ही काय मागतो तर स्वच्छ पाणी ते देण्यास जर एक महिना लागत असेल तर नेमके काय समजायचे.
आदिवासी भागातील लोक हे खूप स्वाभिमानी असून त्यांचा उद्रेक झाला तर पळता भुई थोडी होईल हे प्रशासन आणि पदाधिकारी यांनी समजून घ्यावे, असा इशारा येथील महिलांनी दिला.
कोहंडी येथील महिलांनी अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीताताई भांगरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी महिलांच्या भावना लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत आत्ताच्या आत्ता महिलांना पाणी मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेतली. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा कोणत्याही प्रकारचा धाक दरारा अधिकारी वर्गात शिल्लक नसल्याने अधिकार्‍यांची मनमानी चालू आहे. दूषित पाण्यात टीसीएल टाकायचे सुद्धा काम केले जात नाही. लहान मुले आजारी पडून हजारो रूपये दवाखान्याचे बिल भरावे लागत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायत ग्रामसेवक शिंदे यांना श्रीमती भांगरे यांनी फोनवर चांगलेच धारेवर धरले. आजच टँकरची व्यवस्था करतो, असे शिंदे यांनी सांगितले. आज दुपारपर्यंत पाणी नाही आले तर पुन्हा फोन करा. मी पुन्हा येते असे म्हणत श्रीमती भांगरे यांनी महिलांना आधार दिला. आदिवासी भागातील परिस्थिती बिकट असून शेतीचे पाणी सोडा, पिण्याचे पाणी देखील मिळत नाही. त्यामुळे विकासाच्या गप्पा मारणार्‍यानी जरा या माझ्या मायमाऊल्यांचा प्रश्न समजून घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, जमत नसेल तर आपल्या खुर्चा खाली कराव्या, असा टोला सुनीताताई भांगरे यांनी लोकप्रतिनिधी यांना लगावला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख