तूप चोरीनंतर जमीन हडपण्याच्या आरोपांनी भाऊसाहेब वाकचौरेंची कोंडी

मी किंवा माझ्या पत्नीने कुणाची जमीन हडप केलेली नाही – वाकचौरे

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर याआधी तुप चोरीचे आणि आता जमीन हाडपण्याचा आरोप होत आहे. या आरोपामुळे वाकचौरे मोठ्या अडचणीत आले असून यावर उत्तरे देताना भाऊसाहेब वाकचौरेंची अडचण होतांना दिसत आहे.
नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाकचौरे यांच्यावर जमीन हाडपण्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपावर प्रतिउत्तर देताना मी कुणाचीही जमीन हडप केलेली नाही असे सांगत मुख्यमंत्री यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत .
भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका मालमत्ता धारकाने मी त्यांची जमीन हडपली अशा पद्धतीने चौकशी करण्याचे पत्र दिलेले होते हे धादांत खोटे आहे. लोकसभा निवडणुकीत मी उमेदवार असून माझी बदनामी व्हावी या उद्देशाने हे पत्र देण्यात आलेले असून सदर बाब न्यायप्रविष्ठ आहे. कुणाचीही जमीन मी हडप केलेली नाही ते ते म्हणाले. सावळविहीर येथील जमिनीचे खरेदी खत हे मी खासदार असल्यापूर्वीच करण्यात आलेले होते. त्यानंतर खरेदी कायम करण्यासाठी उर्वरित रक्कम देखील मी दिली. मात्र जमीन मालक खरेदी करून देत नव्हता. कोपरगाव दिवाणी न्यायालयात आपण धाव घेतली आणि मनाई हुकूम देखील घेतला. सदर निकाल आपल्या विरोधात गेला म्हणून जिल्हा न्यायालयात सध्या मनाई हुकूम घेतला. खरेदी केलेल्या 50 गुंठे क्षेत्रातील काही जमीन नगर कोपरगाव रस्त्याच्या रुंदीकरणात गेली. त्यानंतर या मोबदल्यावर पंधरा वारसदारांनी हक्क देखील सांगितला त्यामुळे ही रक्कम न्यायालयात जमा करण्यात आलेली आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असून मी किंवा माझ्या पत्नीने कुणाची फसवणूक केलेली नाही कुणाची जमीन हडप केलेली नाही. मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देण्यात आलेली आहे असे सांगत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळलेले आहेत. तर दुसरीकडे महायुतीते उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी पुन्हा एकदा वाकचौरे यांच्यावर तुप घोटाळ्याचा आरोप करत वाकचौरेंची अडचण केली आहे. आधिच दलबदलू, गद्दार या आरोपांनी वाकचौरे त्रस्त असताना आता जमीन घोटाळा, तुप घोटाळा यामुळे वाकचौरे खरच साईबाबांचे भक्त आहेत का अशी शंका शिर्डी मतदारसंघातील मतदारांना येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख