Friday, October 4, 2024

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये शोककळा; गुन्हा दाखल

हुंड्याच्या मागणीमुळे विवाहितेची आत्महत्या

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील अंकिता प्रतीक वाणी (अंकिता दिघे) (वय 25) हिने सासरच्या छळाला कंटाळून पुण्यात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अंकिताचे वडील हौशीराम लहानू दिघे, जोर्वे, ता. संगमनेर यांनी रावेत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.अंकिता हिचा विवाह 18 एप्रिल 2024 रोजी प्रतिक वाणी (वय 28) या तरुणाशी मोठ्या थाटामाटात संगमनेर येथे संपन्न झाला होता. विवाहाच्या वेळी प्रतिक आणि त्याच्या वडिलांनी ५ तोळे सोने आणि ४ लाख रुपयांची मागणी केली होती. लग्नाच्या वेळी सोने दिले गेले, परंतु आर्थिक अडचणीमुळे हुंड्याचे पैसे नंतर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.विवाहानंतर अंकिता तिच्या सासरी झरेकाठी, संगमनेर येथे राहत होती. तर प्रतिक पुण्यात नोकरीनिमित्त वास्तव्यास होता. दरम्यान, प्रतिक शनिवारी आणि रविवारी घरी येत असताना अंकिताला मानसिक त्रास देत असे. “तू खूप बारीक आहेस, तुझ्यापेक्षा सुंदर मुली मला मिळाल्या असत्या,’ असे सांगत तो तिला वारंवार टोमणे मारत असे.

Dowry Cruelty and Dowry Death

त्याचबरोबर सासरचे लोक देखील हुंड्याच्या पैशासाठी तिला त्रास देत होते. या सर्व त्रासामुळे अंकिता नेहमी मानसिक तणावाखाली राहत होती असे दिघे यांनी तक्रारीत सांगितले आहे.अंकिताने रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या वडिलांना प्रतिकने लॅपटॉप आणि उर्वरित ४ लाख रुपयांची मागणी केल्याचे सांगितले होते. त्यानंतरही सासरच्या लोकांकडून तिचा छळ सुरूच होता. प्रतिकने अंकिताला डोनेशन भरून एमसीएच्या शिक्षणासाठी ऍडमिशन घेण्यास भाग पाडले होते आणि या पैशांची देखील मागणी तिच्या माहेरच्या लोकांकडे केली होती. अंकिताने आपल्या भावाकडे सासरचे लोक त्रास देत असल्याचे सांगितले होते.अखेर, दि. 1 सप्टेंबर 2024 रोजी अंकिताने पुण्यातील एम विंग, प्लॉट नंबर 902, वर्धमान पामरोज, पांढरे वस्ती, पुनावळे, ता. मुळशी, पुणे येथील सोसायटीत नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिच्या कुटुंबीयांनी प्रतिक, त्याचे वडील गंगाधर वाणी, आणि सासू अल्पना वाणी यांच्यावर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख करीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख