विजय ना. पतसंस्थेचा १ लक्ष श्रीगणपती अथर्वशीर्षआवर्तन कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला

0
768

युवावार्ता (प्रतिनिधी)
दि.13 सप्टेबर 2024 रोजी विजय पतसंस्था आयोजित व पुरोहित संघ, ब्राम्हण प्रतिष्ठान, गणेश फेस्टिवल, संस्कृत संवर्धन मंडळ यांच्या सहकार्याने मालपाणी लॉन्स संगमनेर येथे 1 लक्ष श्रीगणपती अथर्वशीर्ष आवर्तने उत्साहात संपन्न झाले अशी माहिती विजय पतसंस्थेचे चेअरमन डॉ पराग सराफ व व्हाईस चेअरमन विशाल जाखडी यांनी दिली. संगमनेर शहरातील सर्व शाळांमधून 5000 विद्यार्थी व नागरिक उस्फुर्तपणे सहभागी झाले. विजय पतसंस्थेतर्फे शाळा व महाविद्यालयामध्ये अथर्वशीर्ष पठन स्पर्धा घेण्यात आल्या व यशस्वी 64 विद्यार्थ्यांना विजय पतसंस्थेतर्फे बक्षीस रुपी लहान मुलांसाठी असलेले विजय बचत (सेव्हीग्ज खाते) संस्थेतर्फे उघडून देण्यात आले. या कार्यक्रमासाठी , दुर्गाताई तांबे, रचनाताई मालपाणी व शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते. आर्थिक क्षेत्रात भरारी घेत असतानाच संस्था सामाजिक व धार्मिक कार्यातही नेहमीच अग्रेसर असते, अश्या शब्दात दुर्गाताई तांबे यांनी भावना व्यक्त केल्या.

संस्थेचे चेअरमन डॉ. पराग सराफ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. गणेश पूजनासाठी विजय पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन विशाल जाखडी सपत्नीक उपस्थित होते. पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी, संदीप वैद्य, अरुण कुलकर्णी, सागर काळे, प्रतिक जोशी, प्रशांत उपासनी यांनी पौरोहित्य केले. सलग 20 वर्षे यशस्वी पणे असा उपक्रम राबवणारी विजय पतसंस्था ही एकमेव पतसंस्था असल्याचे समाधान उपस्थित भाविकांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विविध मान्यवर, विजय पतसंस्थेचे चेअरमन डॉ. पराग सराफ, व्हा. चेअरमन विशाल जाखडी , संचालक प्रवीण बेलापूरकर, संदीप मुळे, मैथिली कुलकर्णी, डॉ. केदार सराफ, विश्‍वजीत कुलकर्णी, प्रवीण रत्नपारखी, डॉ. उदय जोशी, बाळकृष्ण महाजन, रामनाथ जगताप, भीमाशंकर चकोर, डॉ. वैशाली कुलकर्णी, प्रज्ञा डांगे, प्रवीण कर्पे, अशोक सराफ, रवींद्र जोशी, विनायक कुलकर्णी, कमलाकर भालेकर, सरव्यवस्थापक योगेश उपासनी, शाखा व्यवस्थापक देवयानी जोशी, शाखा व्यवस्थापक कल्पना कोडूर व त्यांच्या सहकार्‍यानी विशेष परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here