Saturday, October 5, 2024

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

मानाच्या गणपतीला वंदन करून संगमनेरात विसर्जन मिरवणुकीला सुरवात

ढोल, ताशे, पारंपरिक वाद्ये आणि डिजेचा दणदणाटात बाप्पा निघाले

(सर्व फोटो काशिनाथ गोसावी)

संगमनेर (दैनिक युवावार्ता) संगमनेरच्या गणेशोत्सवाला 129 वर्षांची प्रदीर्घ परंपरा, दिवसेंदिवस वाढत जाणारा आनंद आणि उत्साह. धार्मिक ऐक्य, गुलाला ऐवजी फुलांची उधळण, लोक संस्कृती जपणारा आणि शांतता व सुव्यवस्थेचा संदेश देणारा हा दहा दिवसाचा गणेशोत्सव आणि त्यानंतर विसर्जन सोहळ्याला संगमनेरात सकाळपासून सुरवात झाली. आपली ऐतिहासिक परंपरा जपत मानाचा पहिला गणपती असणारा सोमेश्वर मित्र मंडळ रंगारगल्ली येथे धार्मिक विद्वेष आणि अशांतता बाजूला ठेवून माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मानाची पहिली आरती होऊन खऱ्या अर्थाने विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली.

आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बरोबर 22 वर्षांपूर्वी संगमनेरकरांनी विसर्जन मिरवणुकीची पद्धत नक्की केली. बरोबर विसर्जनाच्या दिवशी सकाळी गणरायाची पूजा करून मिरवणुकीला प्रारंभ होतो. आ. बाळासाहेब थोरात यांनीही गेले 22 वर्ष विसर्जन मिरवणुकीला उपस्थित राहण्याची परंपरा सातत्याने जपली. आजही लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी आ. थोरात यांच्यासह मा.आ.डाॅ.सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, डॉ. जयश्री थोरात, प्रातांधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, डिवाएसपी हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, माजी नगरसेवक जयवंत पवार, किशोर पवार, संजय काजळे, कैलास लोणारी, मुकुंद गरूडकर यांच्यासह शहरातील प्रमुख मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

मान्यवरांच्या महाआरतीनंतर विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. या मिरवणूकीत ढोल ताशांची गर्जना, मर्दानी खेळांचा आनंद, पारंपरिक नृत्य आणि सर्व धर्मीयांचा सहभाग… बाप्पांच्या निरोपाचे हे ऐतिहासिक क्षण सर्व गणेश भक्त आपल्या डोळ्यात साठवत होते.

सकाळी ९ वाजता सुरू झालेली ही मिरवणूक कासव गतीने जसजशी पुढे जाऊ लागली तसतसा मिरवणूकीतील उत्साह वाढू लागला. ढोल, ताशे आणि पारंपरिक वाद्ये त्यावर मर्दानी खेळ, आणि त्यात राजकीय, प्रशासकीय व्यक्तींचा साहसी सहभाग लक्षवेधी ठरत होता. हलगीवर काही बाल कलाकारांनी धरलेला ठेका तर अप्रतिम असा होता. आदीवासी नृत्य, विविध सोंगे, वेगवेगळ्या व लक्षवेधी वेषभूषा आणि त्यांचा खेळ, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांनी चालविलेली आणि फसलेली लाठीकाठी चा खेळ देखील लक्षवेधी ठरत होता. हा अनोखा आणि पारंपरिक सोहळा पहाण्यासाठी हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते.

मानाचा हा पहिला गणपती आपल्या प्रवासाला निघाला आणि पाठोपाठ शहरातील मानाच्या इतर गणपतींनी देखील आपली तयारी सुरू केली. संध्याकाळी पाच नंतर मानाचे आणि इतर मोठे गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक मेन रोड या मुख्य मिरवणूक मार्गावर यायला सुरुवात होते आणि खऱ्या अर्थाने हा सोहळा रंगतदार होतो. रात्री उशिरापर्यंत हा मिरवणूक सोहळा सुरू असतो आणि हजारो नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून या सोहळ्याचा आंनद घेत असतात.
हा संपूर्ण सोहळा शांततेत व उत्साहात साजरा होण्यासाठी पोलीस प्रशासनाने देखील आपली संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. (सर्व फोटो काशिनाथ गोसावी)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख