Saturday, October 5, 2024

ध्रुव ग्लोबल स्कूलचे गिरीश डागा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

संपूर्ण प्रक्रियेतून ध्रुव ग्लोबल स्कूलचे श्री गिरीशजी डागा हे विविध कसोट्यांवर यशस्वी

संगमनेर (प्रतिनिधी) – ध्रुव ग्लोबल स्कूल, संगमनेरचे क्रिएटिव्ह हेड आणि समुपदेशक श्री गिरीश डागा यांना शालेय अध्यापन, शिक्षक-पालक प्रशिक्षण आणि समुपदेशन या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल विचार भारती आणि श्रीनी फाउंडेशनतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
विचार भारती ही एक राज्यस्तरीय संस्था असून प्रबोधन, उद्बोधन, सक्षमीकरण आणि या सर्वांच्या माध्यमातून परिवर्तन या चार तत्त्वांवर काम करत आहे. श्रीनी फाउंडेशन ही शिक्षण, सेवा, संस्कृती इत्यादी क्षेत्रात काम करणारी संस्था आहे.

शालेय शिक्षण क्षेत्रात समर्पित वृत्तीने काम करून राष्ट्र उभारणीत योगदान देणार्‍या शिक्षकांच्या आदर्शांची सर्वांना जाणीव व्हावी या उद्देशाने या दोन्ही संस्थांनी संयुक्तपणे हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. यासाठी 65 हून अधिक शाळांकडून नामांकन प्राप्त झाले होते. पारदर्शकता आणि सत्यता राखण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील अनुभवी आणि राष्ट्रपती-पंतप्रधानांच्या हस्ते सम्मानित व्यक्तींचे परीक्षक मंडळ तयार करण्यात आले. पुरस्कार निवडीची ही प्रक्रिया तीन स्तरांतून गेली ज्यामध्ये प्रथम नामांकनात नमूद केलेल्या कामाच्या आधारे निवड केली गेली. यानंतर निवड झालेल्यांची थेट मुलाखती व निवड झालेल्या शिक्षकांच्या शहरातील व शाळेतील कामाचा तपशील स्थानिक पातळीवर घेण्यात आला. ज्याचे कार्य शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या सर्वांसाठी आदर्श ठरेल अशा व्यक्तीची निवड करणे हा यामागचा उद्देश होता.

या संपूर्ण प्रक्रियेतून ध्रुव ग्लोबल स्कूलचे श्री गिरीशजी डागा हे विविध कसोट्यांवर यशस्वी ठरले. प्रयोगशीलता, पालक-शिक्षक प्रशिक्षण, राष्ट्रीय स्तरावर संस्कार कार्य, सामाजिक क्षेत्रातील सेवा कार्य, नाट्य लेखन दिग्दर्शन इत्यादी कामांसाठी मराठा विद्या प्रसारक समाजाचे सचिव डॉ. विश्‍वासराव आथरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अहिल्यानगर येथील माऊली सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ज्ञ तसेच गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ.संजयजी मालपाणी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त संचालक श्री रविंद्रजी शिंगणापूरकर उपस्थित होते. हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझे सहकारी, कुटुंबातील सदस्य आणि संपूर्ण ध्रुव ग्लोबल स्कूलचा आहे, अशा शब्दांत गिरीशजीनीं आपल्या भावना व्यक्त केल्या.
हा पुरस्कार त्यानी पूज्य स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज आणि डॉ. संजयजी मालपाणी यांना समर्पित केले. पुरस्कार म्हणून त्यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रु 15000/- चे मानधन देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर श्री श्रीगोपाल जाखोटिया, श्री रविंद्रजी मुळे, श्री महेंद्र जाखोटे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख