वाढदिवसानिमित्त आ. खताळांना शुभेच्छा देण्यासाठी मंत्री संगमनेरात

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -शासकीय समित्यांमध्ये ठरल्याप्रमाणे शिवसेनेला प्राधान्य मिळाले पाहिजे. याविषयी आपण पालकमंत्र्यांशी चर्चा करणार असून शिवसेनेच्या पदाधिकार्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही असा विश्वास अहिल्यानगरचे संपर्कप्रमुख व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामान त्यांनी शिवसेना पदाधिकार्यांना दिला
नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी निवड झाल्यानंतर नूतन संपर्कप्रमुख उदय सामंत हे प्रथमच संगमनेरला शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठकीसाठी आले होते सर्वप्रथम त्यांचे आमदार अमोल खताळ यांनी स्वागत केले यावेळी शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ पाटील शिर्डीचे माजी खासदार सदाशिव लोखंडे शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते प्रवक्ते संजीव भोर युवासेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ जगन देशमुख रमेश काळे रणजित ढेरंगे तुषार गजे ज्येष्ठ नेते संतोष रोहम तालुका प्रमुख रामभाऊ राहणे राजेंद्र सोनवणे तालुका संघटक मंजा बापू साळवे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी नगर सेविका साक्षी सूर्यवंशी महिला उपजिल्हाप्रमुख दिपाली वाव्हळ युवा सेना उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख तालुकाप्रमुख सुशील शेवाळे शहर प्रमुख सार्थक शेवाळे यांच्यासह शिवसेना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपर्कप्रमुख सामंत म्हणाले की शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर नाशिक व अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे., त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आता अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील शिवसेने च्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात येणार असून, शिवसेना, महिला सेना, युवासेना आदी सर्व विभागांमध्ये गटप्रमुखापासून जिल्हा प्रमुखांपर्यंतची सर्व पदे भरलेली असावीत, यासाठी ही बैठक घेत आहे तसेच अहिल्यानगर मधील दोन्ही लोकसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष अधिक मजबूत व्हावा, यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

उद्योग विभागाला राज्य शासनाचा निधी मिळतो का, असा प्रश्न माध्यम प्रतिनिधी विचारला असता असता सामंत म्हणाले की, उद्योग विभाग हा औद्योगिक वसाहतींच्या माध्यमातून स्वतःचा निधी उभा करत असतो. त्यामुळे उद्योग विभागाला वेगळ्या निधीची आवश्यकता भासत नाही.
आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात औद्योगिक वसाहत उभी राहावी अशी मागणी आपणाकडे केली आहे त्यांची मागणी पूर्ण केली असून एम आयडीसी मंजूर झाली आहे, पुढील दोन महिन्यांत त्या संदर्भातील प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले शिर्डी येथे एमआयडीसी उभारण्यात आली असून, माझ्या कार्यकाळात अनेक मोठे उद्योग तेथे आले आहेत. तसेच श्रीगोंदा, नेवासा आणि राज्यातील इतर अनेक मतदार संघांमध्ये नवीन एमआयडीसी दिल्या जात आहेत भविष्यात मुंबई, पुणे आणि नाशिकनंतर उद्योजकांनी अहिल्यानगरकडे आकर्षित व्हावे, यासाठी उद्योग विभाग विशेष प्रयत्न करत असल्याचेही सामंत यांनी नमूद केले.

सध्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेबाबत विचारले असता, उदय सामंत म्हणाले की, अशी कृत्ये करणारी प्रवृत्ती अत्यंत नीच असून, पोलीस प्रशासनाने अशा प्रवृत्तीला कायमची आळा घातला पाहिजे.
भविष्यात जिल्ह्यात, राज्यातच नव्हे तर देशात कुणीही अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस करू नये, अशी कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस प्रशासन कायद्याची अंमलबजावणी करत असले तरी आणखी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

शक्ती कायद्याला शिवसेनेचा पाठिंबा
शक्ती कायद्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार ठेहळीं झरुरी यांनी केलेल्या मागणीवर बोलताना सामंत म्हणाले की, शक्ती कायद्याला विधानसभेने एकमताने मंजुरी दिली आहे.
शिवसेना शक्ती कायद्याच्या विरोधात नसून, हा कायदा लागू झाला पाहिजे, या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्वजण शक्ती कायदा लागू करण्यासाठी पाठपुरावा करत आहोत, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.





















