डॉ. नेहा पगडाल यांच्या डर्मा ब्लीस हाॅस्पीटलचे दिमाखात उद्घाटन

पगडाल परिवाराचे वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक दमदार पाऊल

विविध मान्यवरांच्या उपस्थीतीत पार पडला उद्घाटन साेहळा

केसांच्या समस्येसह त्वचेशी संबंधित आजारावर मिळणार खात्रीशीर व प्रभावी उपचारासाठी

संगमनेर शहरातील पगडाल परिवाराने वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे. त्वचारोगावर अत्याधुनिक पध्दतीने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. नेहा सौरभ पगडाल यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या डर्मा ब्लीस या नुतन आरोग्य दालनाचे आज शनिवारी दुपारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन पार पडले.


संगमनेर नगरपरिषदेचे माजी प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल यांचे सुपूत्र व माजी नगरसेवक हिरालाल पगडाल यांचे पुतणे डॉ. सौरभ पगडाल यांच्या येथील नवीन नगर रोड, ताजणे मळा, जठार हॉस्पिटलजवळ डॉ. पगडाल क्लिनिक या ठिकाणी नव्याने सुरू झालेल्या या डर्मा ब्लीस सेंटरमध्ये विविध त्वचाविकारावर अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जाणार आहे. तसेच केसांच्या समस्येवर उपाय यासह त्वचेशी संबंधित आजारावर खात्रीशीर व प्रभावी उपचारासाठी या ठिकाणी सुविधा असणार आहे.
या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत डॉ. नेहा पगडाल, डॉ. सौरभ पगडाल, अरविंद पगडाल, हिरालाल पगडाल, श्रीनिवास पगडाल, दत्तात्रय पगडाल, गणेश पगडाल यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख