संगमनेरात रामोत्सवाची जय्यत तयारी

शहरातील व तालुक्यातील 251 मंदिरांमध्ये कार्यक्रमांचे नियोजन

अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा 22 जानेवारीला झाल्यानंतर आता संगमनेरात पुन्हा एकदा राम जन्मोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मंगळवारी (ता.9) गुढी पाडव्यापासून ते 23 एप्रिल हनुमान जयंतीपर्यंत रामोत्सव साजरा केला जाणार आहे. गुढीपाडवा, रामनवमी व हनुमान जयंती असे महत्त्वाचे सण या कालावधीत होत असल्याने संगमनेर शहर व तालुक्यात वातावरण पुन्हा एकदा राममय करण्यासाठी सुक्ष्म नियोजन केले जात आहे.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – रामलल्लाच्या प्रतिष्ठापणेवेळी संगमनेरातील 251 मंदिरांमध्ये हा उत्सव साजरा झाला होता. आता रामोत्सवासाठी पुन्हा या 251 मंदिरांना विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने विनंती केली जाणार आहे. गुढीपाडवा, रामनवमी व हनुमान जयंती या मंदिरात साजरी करावी. या उत्सवांच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीविषयी जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मिरवणूक, शोभायात्रा, प्रवचन व कीर्तन या माध्यमातून यंदाची रामनवमी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन सुरू आहे.


गुढी पाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरवात आहे. नव्या पिढीला हिंदू नववर्षाचे प्रबोधन करणे, पारंपरिक वाद्यातील मिरवणुका, कीर्तन, प्रवचानातून प्रबोधन करावे, यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. गुढीपाडवा ते हनुमान जयंती या कालावधीत रामोत्सव होणार आहे अशी माहिती बजरंग दल संयोजक कुलदीप ठाकूर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख