
संगमनेर
संगमनेरसह संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या येथील जोशी स्वीट होम तसेच जोशी पॅलेस चे संस्थापक तसेच राजस्थानी ब्राह्मण समाज ट्रस्ट अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुरेश काका जोशी यांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. संगमनेर म्हटले की, जोशी स्वीट होम हे अनेक वर्षांपासून समीकरण बनले आहे. जोशींची जिलेबी न खाल्लेला माणूस संगमनेर व परिसरात शोधून सापडणार नाही.

अशा या प्रसिद्ध जोशी स्वीटचे संस्थापक असलेले व सुरेशकाका नावाने सुप्रसिद्ध असलेले सुरेशकाका जोशी यांचे अकस्मात निधन सर्वांना चटका लावून जाणारे ठरले आहे. राजस्थानी ब्राम्हण समाज ट्रस्ट अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी सामाजिक कार्यात भरीव योगदान दिले. बाबूशेठ ऊर्फ बाळासाहेब जोशी यांचे ते काका होते तसेच राजेश व अभिजित जोशी यांचे ते वडील होते. त्यांचा चलावा आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट त्यांचे निवासस्थान — हॉटेल जोशी पॅलेस, बस स्टँड के पास, संगमनेर येथून निघणार आहे
दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने सुरेशकाका जोशींना भावपूर्ण श्रध्दांजली.