
युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले- अकोले तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांच्या मातोश्री सौभाग्यवती राधाबाई लक्ष्मण नवले (वय -92) यांचे वृध्दापकाळाने नवलेवाडी येथे राहत्या घरी निधन झाले.
कै. राधाबाई नवले या जुन्या पिढीतील एक कर्तबगार महिला होत्या. त्यांनी पती लक्ष्मण नवले यांच्या खांद्याला खांदा देत साथ दिली. मुलांना चांगले शिक्षण व चांगले संस्कार दिले. त्यामुळे हा नवले परिवार संपूर्ण तालुक्यातील एक आदर्श परिवार म्हणून ओळखला जातो. त्यांच्या पश्चात मुले मधुकर लक्ष्मण नवले , भागवत लक्ष्मण नवले, अरुण लक्ष्मण नवले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मातोश्री राधाबाई नवले यांचे पार्थिव दुपारी 3 वाजेपर्यंत धामणगाव आवारी रोड निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. नंतर नवलेवाडी गावातून त्यांचे पार्थिवावर नवलेवाडी स्मशानभूमी (नवलेवाडी फाटा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने मातोश्री कै. राधाबाई लक्ष्मण नवले यांना भावपूर्ण श्रध्दांजली.






















