आ. सत्यजित तांबे यांच्या जनता दरबारात समस्यांचा तातडीने निपटारा

0
14

महिला, युवक आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर विशेष लक्ष

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामे, सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास, दुग्ध व्यवसाय, शेती यामधून संगमनेर तालुका समृद्ध केला शांतता व सुव्यवस्था अशी ओळख असलेल्या संगमनेर तालुक्यात मागील दीड वर्षापासून नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. जनतेचे प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात हेच पर्याय असून आमदार सत्यजित तांबे यांनी घेतलेल्या जनता दरबारात संगमनेर मधील नागरिकांचा मोठा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे आमदार सत्यजित तांबे यांनी नागरिकांचे विविध प्रश्न सोडवणुकीसाठी जनता दरबार घेतला. यावेळी संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिक,युवक, महिला व कार्यकर्ते यांची मोठी लक्षणीय उपस्थिती होती.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका व शहरांमध्ये अनेक मोठ मोठी विकास कामे मार्गी लागली आहेत. याचबरोबर शांतता सुव्यवस्था आणि बंधू भावाचे वातावरण हे संगमनेर शहराचे वैशिष्ट्य राहिले. यामुळे बाजारपेठ फुलली. शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या प्रामाणिक संस्कृतीमुळे राज्यभरामध्ये सज्जन तालुका म्हणून संगमनेरची ओळख निर्माण झाली. मात्र मागील दीड वर्षापासून संगमनेर शहर व तालुक्यामधील नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा आपला परिवार मानला. तालुक्यात पठारभाग, प्रवरा पट्टा आणि तळेगाव पट्टा असे तीन भौगोलिक विभाग असून 171 गावे आणि 258 वाड्या वस्त्या आहेत. निळवंडे धरण डावा व उजवा कालवा, थेट पाईपलाईन योजना हायटेक बसस्थानकासह शहरांमध्ये विविध वैभवशाली इमारती, नाशिक – पुणे महामार्गाची चौपदरीकरण शहरांमध्ये येणार्‍या चारही बाजूच्या रस्त्यांचे चौपदरीकरण यांसह प्रत्येक गावात विकासाच्या योजना राबवण्यात बरोबरच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्राधान्य दिले. प्रत्येक नागरिकाला आपले प्रश्न सोडवण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात हेच जिव्हाळ्याचे वाटत आहे.

आणि आलेल्या प्रत्येक नागरिकांचे प्रश्न लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे सोडवत आहेत. आमदार सत्यजित तांबे यांची विविध भाषांवरील प्रभुत्व, प्रशासनावरील जबर पकड, विविध राजकीय पक्षांमधील सर्वांची स्नेहाचे संबंध, प्रत्येक प्रश्नासाठी पाठपुरावा करण्याची पद्धत,प्रश्न सोडवण्याची हातोटी, विविध विषयांचा अभ्यास यामुळे नागरिकांचे तात्काळ प्रश्न मार्गी लागत आहे. प्रत्येक प्रश्नाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करून रोखठोक पद्धतीने काम करण्याची त्यांची पद्धत सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच भावली आहे. त्यांनी यशोधन कार्यालयात घेतलेल्या जनता दरबारात लोकांची वैयक्तिक आणि अडचणीचे अनेक कामे मार्गी लावली. याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, जलसंपदा विभागातील, महसूल, पोलीस विभागातील अनेक दिवसांचे प्रलंबित कामेही तात्काळ मार्गी लावली. बचत गटांच्या महिलांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला.

यावेळी संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात उपस्थित होत्या. तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्यासह विविध नगरसेवक व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यशोधन कार्यालयामध्ये तालुक्यातील व तालुका बाहेरून आलेल्या सर्व नागरिकांचे प्रश्न समजावून घेऊन प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा केला जातो. हे जनसंपर्क कार्यालय जनतेच्या मदतीचे केंद्र ठरले असल्याचे प्रतिपादन कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here