लायन्स क्लब संगमनेर व ब्रम्हाकुमारीजींच्या वतीने प्रेरणादायी व्याख्यान
स्वत:पासून, आपल्या घरापासून आपण बदलले पाहिजे. देवदेवतांच्या मागे जशी पवित्र आभा असते तशीत आभा आपल्या वर्तनातून आणि विचारांतून दिसू शकेल असे त्या म्हणाल्या. अती दु:खाच्या अथवा कोणत्याही कठीण प्रसंगात जेव्हा आपण संयमी राहू तेव्हा खर्या अर्थाने आपण शक्तीस्तंभ होऊ. व्याख्यानाच्या शेवटी नर चा नारायण आणि नारी ची श्रीलक्ष्मी होण्यासाठी म्हणजेच सतयुग येण्यासाठी आपल्या पवित्रता, शांती, प्रेम, सुख, आनंद, शक्ती, ज्ञान यांचा अंगीकार करावा लागेल असे शिवानी दीदी यांनी सांगितले.
स्वणिम् विचाराें सें स्वणिम् संसार या व्याख्यानाने श्राेते भारावले
त्रिदिवसीय विनामुल्य राजयाेग शिबीर
दैनिक युवावार्ता
संगमनेर (प्रतिनिधी) – आपल्याबरोबरच कुटुंब आणि समाजव्यवस्था चांगली होण्यासाठी आणि सतयुगासाठी स्वत:चे आचार व विचार शुध्द असावे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त ब्रम्हाकुमारी शिवानी दीदी यांनी केले. लायन्स क्लब संगमनेर व ब्रम्हाकुमारीज् तपस्या भवन यांच्या संयुक्त विद्यमाने मालपाणी लॉन्स येथे आयोजित ‘स्वर्णिम विचारो सें स्वर्णिम संस्कार’ या विषयावर शिवानी दीदी यांनी ओजस्वी व्याख्यान दिले.
राखी संतोष करवा आणि अनुराधा संजय मालपाणी यांच्या प्रयत्नांतून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
ज्या हाताने आपण मारतो, खाली पाडतो, ढकलतो त्याच हाताने आपण आशीर्वाद सुध्दा देऊ शकतो. ही प्रक्रिया आपल्या विचारांवर अवलंबून आहे. या विचारांची खरी उत्पत्ती आत्म्यातून होते. अनेक विचारांनी आपण एखादी कृती करतो. ती कृती म्हणजे आपले संस्कार असतात. या संस्कारांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो असे यावेळी शिवानी दीदी यांनी सांगितले.
तरूण मुलगा पहिल्यांदा सिगरेट ओढताना अनेक वेळा विचार करतो. याची सवय लागेल, आपले आरोग्य खराब होईल मात्र तो मुलगा एकदा ओढतो. असे करता करता त्याला सवय लागते. ही सवय म्हणजे त्याचे संस्कार. हे संस्कार बदलले तर आपले घर बदलेल. घर बदलले तर समाज बदलेल आणि समाज बदलला तर सतयुग येण्यासाठी वेळ लागणार नाही.
मैं पवित्र आत्मा हूँ असा संदेश त्यांनी दिला. आपण आपल्या रागावर नियंत्रण मिळविले पाहिजे. त्याचबरोबर मोह-माया यांच्यापासून लांब राहिले पाहिजे. आजपासून राग, मोह, माया, मत्सर यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्याचे आवाहन शिवानी दीदी यांनी केले.
ज्यावेळी मनुष्य कोणत्याही परिस्थितीमध्ये अचल असतो, अढळ असतो तेव्हा तो त्या घरचा शक्तीस्तंभ होतो. तो सर्वांना आधार देतो. आनंदाचे वातावरण निर्माण करतो, सर्वांना सुख शांती देण्यासाठी प्रेरित करतो. मैं मेरे घर का शक्तीस्तंभ हूँ, मुझे किसीसे कुछ नहीं चाहिए हा संदेश देताना हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले यावेळी भावनिक झाले होते.
उपस्थितांचा परिचय उद्योजक संतोष करवा यांनी करून दिला. राखी करवा यांनी शिवानी दीदी यांच्या कार्याचा परिचय उपस्थितांना करून दिला. अनुराधा मालपाणी यांनी शिवानी दीदी यांच्या सन्मानपत्राचे वाचन केले. ललितादेवी मालपाणी यांच्या हस्ते शिवानी दीदी यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी संगमनेरच्या मा. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, एकवीरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शरयूताई थोरात, उद्योजक राजेश मालपाणी, संजय मालपाणी, दिलीप मालपाणी, हर्ष मालपाणी, आदित्य मालपाणी, रामनाथ आरोटे, लायन्स क्लब संगमनेरचे अध्यक्ष ललित देसाई, सेके्रेटरी डॉ. राजन ठाकूर, संतोष करवा, अमोल खटाटे, राजेश लाहोटी, कुशावर्त कासट, प्रकाश कलंत्री, पद्मा कलंत्री, सीए बापूसा टाक, संजय आसावा, बबिता आसावा, रूपा गग्गड, तन्मय करवा, ब्रम्हाकुमारीज् तपस्या भवनातील सर्व पदाधिकारी, साधक आणि संगमनेरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतेे.
त्रिदिवसीय विनामूल्य राजयाेग शिबीर
16 डिसेंबर ते 18 डिसेंबर सकाळी 7 ते 8 किंवा सायंकाळी 5 ते 6, स्थानिक सेवाकेंद्र – ब्रह्माकुमारीज् तपस्या भवन, गाेल्डन सिटी, अकाेले बायपास राेड, संगमनेर, रजिस्टेशनसाठी व्हाॅट्सअॅप करा 9423461860, 9604568845