संगमनेर एमआयडीसीला अखेर मंजुरी

0
2

तरुणांच्या रोजगारासाठी मोठे पाऊल – आ. अमोल खताळ

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- तालुक्यातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण संगमनेरला एमआयडीसी सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला असून एमआयडीसीला मंजुरी मिळाली आहे लवकरच एमआयडीसी बाबतचे नोटिफिकेशन निघणार असून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महायुती व युवासेना कटिबद्ध असल्याचे आ. अमोल खताळ यांनी सांगितले.

संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे युवासेनेच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी तरुणांना मार्गदर्शन करताना आ. खताळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युवासेनेचे जिल्हाप्रमुख शुभम वाघ, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य दादाभाऊ गुंजाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र सोनवणे, उपजिल्हाप्रमुख रमेश काळे, मंजाबापू साळवे, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, महिला उपजिल्हा प्रमुख दिपाली वावळ, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, युवासेना उपजिल्हा प्रमुख सौरभ देशमुख, तालुकाप्रमुख सुशील शेवाळे, शहरप्रमुख सार्थक शेवाळे, डॉ. अमोल कर्पे, आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान या रोजगार मेळाव्यासाठी 600 तरुण-तरुणींनी मुलाखती दिल्या त्यापैकी 125 तरुणी तरुणींनी तरुणीची प्राथमिक निवड करण्यात आली तर काहींना जागेवर ऑफर लेटर देखील देण्यात आले.

आमदार खताळ म्हणाले की, संगमनेरमधील तरुणांना त्यांच्या शिक्षणानुसार आणि कौशल्यानुसार नोकरी मिळावी, यासाठी शिवसेना युवासेना कटिबद्ध आहे. ग्रामीण भागातील तरुणांनाही रोजगाराच्या संधी मिळावी या उद्देशाने पारेगाव येथे नव्याने सुरू झालेल्या उद्योगात सुमारे 600 ते 650 युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संगमनेरमधील उद्योजकांनीही पुढाकार घेत स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. या रोजगार प्रक्रियेसाठी तब्बल 1 हजार ,800 युवकांनी नोंदणी केली. त्यापैकी अनेकांनी ऑनलाइन अर्ज सादर केले. बीएससी, एमएससी, बीसीए, आयटीआय तसेच इतर विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या युवकां साठी लहान-मोठ्या स्वरूपाच्या नोकर्‍यांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रत्येकाने केवळ नोकरीच करावी असे नाही, तर काही तरुणांनी उद्योजक बनून इतरांना रोजगार द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here