
निमा संगमनेरची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; २०२६–२०२८ साठी नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड संगमनेर, दि. २६ नोव्हेंबर : डॉक्टरांची एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि रुग्णसेवेचा वसा जपत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या निमा (NIMA) संगमनेर शाखेच्या २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. हॉटेल सद्गुरू, संगमनेर येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. शरद गुंजाळ होते. यावेळी निमा सचिव डॉ. सौरभ गीते, खजिनदार डॉ. विकास करंजेकर आणि केंद्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. सुभाष मंडलीक यांची प्रमुख उपस्थिती होती. धन्वंतरी पूजनाने सभेची मंगलमय सुरुवात झाली. सचिव डॉ. सौरभ गीते यांनी सन २०२५–२६ चा वार्षिक अहवाल सादर केला, तर खजिनदार डॉ. विकास करंजेकर यांनी आर्थिक अहवाल मांडला. अध्यक्ष डॉ. शरद गुंजाळ यांनी वर्षभरातील संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. नवीन कार्यकारिणीवर सर्वानुमते शिक्कामोर्तब सन २०२६ ते २०२८ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी झालेल्या निवड प्रक्रियेत निमा संघटनेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. सुभाष कोल्हे, डॉ. जी. पी. शेख, डॉ. सुधाकर पेटकर, डॉ. संजय मेहता व डॉ. शुभदा देशमुख यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी डॉ. विकास करंजेकर, सचिवपदी डॉ. सागर फापाळे आणि खजिनदारपदी डॉ. संदीप अरगडे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी डॉ. असिफ तांबोळी व डॉ. किशोर सारस्वत, तर सहसचिवपदी डॉ. सुशांत गिरी व डॉ. निशांत इंगळे यांची निवड झाली. राज्य शाखा प्रतिनिधी म्हणून डॉ. शरद गुंजाळ, डॉ. सौरभ गीते, डॉ. सागर फापाळे, डॉ. संदीप कडलग, डॉ. निलेश सातपुते, डॉ. संदीप वामन, डॉ. संगीता रसाळ, डॉ. शुभदा देशमुख व डॉ. किरण चांडक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रुग्णसेवेसोबत सामाजिक बांधिलकी जपणारी निमा

निमा ही केवळ डॉक्टरांची संघटना नसून वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना एकत्र आणून समाजाच्या आरोग्यविषयक गरजांसाठी कार्य करणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. निमा संगमनेर शाखेच्या वतीने वर्षभर संगमनेर तालुक्यात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविले जातात. सर्वसामान्य रुग्णांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा यासाठी विविध वैद्यकीय व आरोग्य तपासणी शिबिरे, आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम, वृक्षारोपण कार्यक्रम तसेच समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जाते. रुग्णसेवा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्व या माध्यमातून संघटना समाजाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचे काम करीत आहे.

आयर्न मॅन डॉ. अमोद कर्पे यांचा विशेष गौरव- निमाचे सदस्य डॉ. अमोद कर्पे यांनी दक्षिण कोरिया येथे आयोजित आव्हानात्मक आयर्न मॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सभेत त्यांचा संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि उल्लेखनीय कामगिरीचे उपस्थित डॉक्टरांनी कौतुक केले.नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून संघटनेची एकजूट अधिक बळकट करणे, डॉक्टरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, सदस्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि समाजाभिमुख आरोग्य व सेवाभावी उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देणे यावर आगामी काळात भर दिला जाणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सभेस निमा संगमनेर शाखेचे सदस्य डॉ निलम शिंदे, डॉ वनिता कर्पे, डॉ विशाखा पाचोरे, डॉ रोहिणी करंजेकर, डॉ धनश्री फापाळे, डॉ रुपाली जोंधळे, डॉ फरीदा मिर्झा, डॉ भारती गुंजाळ, डॉ अतुल देशमुख,डॉ सिद्धार्थ वाघमारे, डॉ महेंद्र कोल्हे, डॉ विठ्ठल शेळके, डॉ सागर कोल्हाळ, डॉ संतोष कानवडे, डॉ संकेत तांबे, डॉ संयम मेहता
यासर्वांची उस्फूर्त उपस्थिती लाभली सभेचे सूत्रसंचालन नवनिर्वाचित सचिव डॉ. सागर फापाळे यांनी केले.उत्साहपूर्ण वातावरणात आणि सर्वांच्या सहकार्याने वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.





















