डिजिटल इनोवेशन व ग्राहक सेवा समाधान अवार्ड

संगमनेर ( प्रतिनिधी ) काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याची आर्थिक कामधेनू म्हणून काम करताना ग्राहक ठेवीदार व नागरिक यांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या सहकारमहर्षी अमृतवाहिनी सहकारी बँकेने डिजिटल प्रणाली अत्यंत अत्याधुनिक केली असून या प्रणालीचा देश पातळीवर गौरव झाला असल्याने बँकेला सर्वोत्कृष्ट बँक डिजिटल इनोव्हेशन अवार्ड व सर्वोत्कृष्ट बँक ग्राहक सेवा समाधान अवॉर्डने गौरवण्यात आले आहे.
हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे नवाब ऑफ हैदराबाद शहा आलम खान यांच्या हस्ते आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाचे विभागीय डायरेक्टर चिन्मयानंद तसेच नाबार्डचे डायरेक्टर सतीश मराठे आणि महाराष्ट्र बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेच्या यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. बँकेच्या वतीने चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन ॲड. नानासाहेब शिंदे,मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती, डिजिटल विभाग प्रमुख अमित नारायण यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

अमृतवाहिनी बँकेने मागील दोन वर्षांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत सभासद,ग्राहक, ठेवीदार यांच्यामध्ये मोठा विश्वास निर्माण केला आहे. सुमारे 1200 कोटींची उलाढाल असलेल्या या बँकेच्या 14 शाखा कार्यरत असून डिजिटल प्रणाली ई बँकिंग सेवा ग्राहकांना पुरवली आहे. चांगल्या कामामुळे राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्काराने बँकेला गौरविण्यात आले आहे. या नव्या दोन पुरस्कारांमुळे बँकेच्या लौकिकामध्ये भर पडला आहे.

या पुरस्कारानंतर बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की, महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी बँक सातत्याने गुणवत्ता पूर्ण काम करत आहे. डिजिटल बँकिंग मध्ये बँकेने अत्यंत चांगले काम केले असून दररोज कोटी रुपयांचा ऑनलाईन व्यवहार होतो आहे. तत्पर सेवा अचूकता विनम्रता हे बँकेने वैशिष्ट्य जपले आहे मिळालेल्या पुरस्कार हा सामूहिक असल्याचे ते म्हणाले.
अमृतवाहिनी बँकेला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेचे मार्गदर्शक राज्याचे माजी कृषी व शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, पांडुरंग पाटील घुले, नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, रमेश गुंजाळ, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, इंद्रजीत भाऊ थोरात, अजय फटांगरे,सोमेश्वर दिवटे, हौशीराम सोनवणे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.





















