शेतीच्या वादातून महिलेसह नातेवाईकांना मारहाण

संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील घटना

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – दोन कुटूंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून जागेच्या वादातून नेहमीच कुरबूर चालू होती. मात्र काल शुक्रवारी सायंकाळी फिर्यादी महिला ट्रॅक्टरवरून शेतात जात असतांना आरोपींनी तीचा रस्ता अडवून तीला खाली पाडून बेदम मारहाण केली. तसेच लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी तीला सोडविण्यासाठी आलेल्या तीच्या नातेवाईकांना देखील आरोपींनी मारहाण केली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथे घडली.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी वनिता दिपक वाळे (रा. मंगळापूर) व आरोपी बाळासाहेब आनंदा वाळे, सविता बाळासाहेब वाळे, सुमन उत्तम वाळे, उत्तम आनंदा वाळे, रविंद्र बाळासाहेब वाळे यांच्यात शेतीच्या जागेवरून वाद होता. दरम्यान काल शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी वनिता वाळे या ट्रॅक्टरमधून जात असतांना वरील आरोपींनी त्यांचा ट्रॅक्टर अडवत आमच्या जागेतून जायचे नाही असे म्हणत ट्रॅक्टरवरून महिलेला खाली ओढत महिलेला बेदम मारहाण केली. तसेच लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी फिर्यादी महिलेला सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या तीच्या नातेवाईकांना देखील आरोपींनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी महिला जखमी झाली असून ग्रामीण रूग्णालयावर तीच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वरील आरोपींवर गुन्हा रजि नं. 1035/2023, भादंवि कलम 354,324, 323, 504, 506, 427, 143, 147 नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख