
शारीरिक संबंध ठेवून पतीसह मुलीला मारण्याची धमकी
आरोपी तरुणावर गुन्हा दाखल
संगमनेर
तुझी मुलगी उचलुन नेईन, तिला परस्पर मारुन टाकीन, तुझ्या नवऱ्याला मारुन टाकीन अशा धमक्या देवुन फिर्यादीशी वेळोवेळी जबरी संभोग करून पैशाची मागणी करुन फिर्यादीचे 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र गहाण ठेवुन काढलेलेली रक्काम व ऑनलाईन 5,00,748/- रुपये रक्कम लुटणाऱ्या शहरालगतच्या राहणे मळा येथील तरुणावर शहर पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील मालदाड रोड येथे कुटुंबासह राहणारी विवाहित महिला एक वर्षापुर्वी घरगुती मेस चालवित होती. त्यांच्या घरासमोर सोनवणे यांचे घर असुन त्यांचा पुतण्या ओमकार नामदेव सोनवणे रा रहाणेमळा, संगमनेर हा अधुन मधुन त्यांचे चुलत्याकडे येत होता. त्याची आणि या महिलेची ओळख झाली. सन 2022 मध्ये मैत्री झाली होती. दिनांक 16/05/2022 रोजी ओमकार नामदेव सोनवणे याने या महिलेला घरी रहाणेमळा येथे बोलावून घेतले. यावेळी तो घरी एकटाच होता. यावेळी त्याने या महिलेशी जबरदस्ती करुन तु मला हात लावू दिला नाही तर, मी तुझ्या पोरीला उचलुन घेवुन जाईन अशी धमकी देवुन त्याने तिच्याशी जबरदस्ती जबरी संभोग केला. त्यानंतर त्याने मी तुझ्या पोरीला उचलुन नेईन, तिला मारुन टाकीन तसेच आपल्या दोघांचे प्रेमसंबंध आहेत असे तुझ्या नवऱ्याला सांगुन त्याने तिच्यासोबत वेळोवेळी कधी तिच्या घरी, कधी त्याच्या घरी, नांदुर शिंगोटे येथील संकेत लॉजवर बळजबरी संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये ओमकार नामदेव सोनवणे याने मला स्वीप्ट कार घ्यायची आहे, मला पैसे दे, नाही दिले तर तुझ्या नवऱ्याला आपले प्रेमसंबंध आहे असे सांगेन. तेव्हा पती यांना समजले तर काय होईल या भीतीने या महिलेने त्याला त्याचे जवळील मोबाईलवर फोन पे करुन एकुण 4,00,898/- रुपये ऑनलाईन पैसे पाठविले.
त्यानंतर त्याने डिसेंबर 2023 महिन्यात मला गाडीचे इन्शुरन्स भरायचे आहे, तु मला पैसे दे, नाहीतर तुझ्या पोरीला उचलून नेईन अशी धमकी दिली. तेव्हा घाबरुन तीने गळ्यातील 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुञ त्याला गहाण ठेवण्यासाठी दिले. त्यानंतर मार्च 2024 मध्ये ओमकार सोनवणे याने मला गाडीचा हप्ता भरायचे आहे मला पैसे दे, नाहीतर तुझ्या नवऱ्याला मारुन टाकीन अशी धमकी दिली. यावेळी तिने तीन तोळ्याची सोन्याची पोत एडीसीसी बँक येथे गहाण ठेवुन तेथुन 59,850/- रुपये रक्कम घेवुन ती रक्कम ओमकार सोनवणे यांस भीतीपोटी नेवून दिली. त्यानंतर दि. 12/01/2025 रोजी दुपारी 02/00 वा. चे सुमारास ओमकार सोनवणे हा तिच्या घरी आला तेव्हा घरी कोणीच नव्हते. तेव्हा त्याने पुन्हा जबरदस्ती संबंध प्रस्थापित करुन माझ्या भावाचे लग्न आहे, पैसे पाठव नाहीतर तुझ्या मुलीला शाळेतुन उचलुन नेवुन परस्पर मारून टाकीन अशी धमकी दिली. तेव्हा मी घाबरुन त्याचे मोबाईल नंबरवर 40.000/- रुपये फोन पे केले. त्याने वेळोवेळी तुझी मुलगी उचलुन नेईन, तुझ्या नव-याला मारुन टाकीन अशी मला वेळोवेळी धमकी देवुन वेळोवेळी माझ्यावर जबरदस्ती करुन जबरी संभोग करुन माझ्याकडून पैसे काढून घेतले.
दिनांक 16/05/2022 ते दिनांक 12/01/2025 दरम्यान ओमकार नामदेव सोनवणे याने तुझी मुलगी उचलुन नेईन, तिला परस्पर मारून टाकीन, तुझ्या नवऱ्याला मारुन टाकीन अशा धमक्या देवुन माझ्यावर वेळोवेळी जबरी संभोग करून पैशाची मागणी करून 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुञ गहाण ठेवुन काढलेलेली रक्काम व ऑनलाईन 5,00,748/- रुपये रक्कम माझ्याकडून घेतले आहे. या प्रकरणी ओमकार नामदेव सोनवणे याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 63/2025 बीएनएस कलम 64, 308(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास शहर पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक पटेल या करीत आहेत.