ह. भ. प. ज्ञानेश्वर (माऊली महाराज)जाधव यांचे अकस्मित निधन

1
493

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर येथील ह.भ.प. किसन महाराज आश्रमाचे मठाधिपती ह.भ.प. ज्ञानेश्‍वर (माऊली महाराज) यांचे हृदयविकाराने सोमवार दि. 27/1/2025 रोजी अकस्मित निधन झाले.
50 वर्षांपुर्वी ह. भ. प. किसन महाराज हारदे यांच्याकडे अनुग्रह घेऊन त्यांच्याशी शिष्यत्व पत्कारून किसन महाराजांची व वारकरी संप्रादयाची त्यांनी अखेर पर्यंत सेवा केली. ह.भ.प. किसन महाराज हरदे यांचे निधनानंतर मठाधिपती म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. अश्रमाचे पावित्र्य अबाधित ठेऊन त्यांनी मंदिरामध्ये अतिशय अकर्षक बदल घडवून आणले. संगमनेर शहर व पंचक्रोषीतील भाविक साधक या आश्रमात नित्याने सेवेसाठी असतात.
आश्रमातील हरिनाम सप्तासह किर्तन प्रवचनाचे वर्षभर कार्यक्रमांचे सुंदर नियोजन ह.भ.प. ज्ञानेश्‍वर माऊली महाराजांचे नेतृत्वाखाली देखण्या स्वरूपात साजरे होत असायचे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे शिष्यगण, साधक, वारकरी संप्रदयातील किर्तनकार, वारकरी, संगमनेर शहरातील नागरीक एकत्र येऊन महाराजांच्या अंतेष्ठीचा मिरवणूक सोहळा करण्यात आला. आश्रमातील हनुमान मंदिरा शेजारी महाराजांचा समाधी सोहळा पार पडला. उपस्थित भक्तगणांनी, नागरीकांनी साश्रू नयनांनी महाराजांना अखेरचा निरोप दिला. ह.भ.प. किसन महाराज हरदे व ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज माऊली यांचे दैनिक युवावार्ता परिवारास सतत अशिर्वाद राहिले आहेत. त्यांच्या स्मतिंना विनम्र अभिवादन.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here