
संपूर्ण फिटनेस अनुभवासाठी संगमनेरमध्ये ए.एस. फिटनेस स्टुडिओ सुरू
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – बदलते वातावरण, बदललेले राहणीमान, बदललेला आहार यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. आपले आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करतात. नागरिकांची ही गरज ओळखून साहेबराव अभंग, अतुल अभंग, सुशांत अभंग व अभंग परिवाराच्यावतीने ए. एस. फिटनेस स्टुडिओची उभारणी केली आहे. शहरातील बी.एड कॉलेज समोर अभंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या या भव्य फिटनेस स्टुडिओचा शुभारंभ शनिवार दि. 25 जानेवारी रोजी दुपारी 04 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे अशी माहिती अतुल अभंग यांनी दिली.
ए.एस. फिटनेस स्टुडिओ यापूर्वी सेवा देतच होता मात्र नागरिकांची मागणी आणि गरज लक्षात घेता 4300 स्क्वे.फूट. भव्य जागेत अद्ययावत मशिनरी आणि जीम साहित्यासह हा स्टुडिओ पुन्हा सुरू होत आहे. या अद्ययावत फिटनेस स्टुडिओमध्ये आरोग्याची गरज ओळखून सर्व नाविण्यपूर्ण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्रशिक्षित जीम ट्रेनर्सच्या मार्गदर्शनाखाली गरज ओळखून स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाणार आहे. या ठिकाणी केवळ व्यायामच नाही तर योगाचे ट्रेनिंग दिले जाणार आहे.
पर्सनल ट्रेनिंग, स्ट्रेन्थ ट्रेनिंग, कार्डिओ ट्रेनिंग, फंक्शनल ट्रेनिंग, किड्स वर्कआऊट, टी. आर. एक्स वर्कआऊट यासह सर्व व्यायाम प्रकार करुन घेतला जाणार आहे. सर्व वयोगटातील सहभागी सदस्यांसाठी हे फिटनेस स्टुडिओ उपलब्ध असणार आहे. अधिक माहितीसाठी 8767514059 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन सुशांत अभंग यांनी केले.
सर्व अद्यावत जीम मशिनरीज, प्रशस्त जागा, वैयक्तिक लक्ष अशा या ए. एस फिटनेस स्टिुडिओच्या शुभारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन साहेबराव अभंग, अतुल अभंग, सुशांत अभंग व अभंग परिवाराने केले आहे.