ग्राहकांच्या सेवेचे तिसरे वर्ष
आधुनिक मशिनरींच्या सहाय्याने हजाराे ग्राहकांचे समाधान
संगमनेर हे जिल्ह्यातील बाजार पेठेचे महत्त्वाचे ठिकाण आहे. सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासीक, राजकीय पार्श्वभुमी असलेल्या या शहरात अनेक उद्योग, व्यवसाय भरभराटीला आले. या उद्योग नगरीत आपला एक व्यवसाय असावा या हेतूने प्रेरित झालेल्या कलंत्री परिवारातील अक्षय कलंत्री व त्यांच्या पत्नी सौ. राधिका कलंत्री यांनी धाडस करत एक वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले. संगमनेरात अद्ययावत कपड्यांचे अनेक दाले आहे. मात्र कपडे धुण्याचे अधुनिक दालन नव्हते. मात्र कलंत्री यांनी संगमनेरात अद्ययावत मशिनरी आणून त्याद्वारे अधुनिक तंत्रज्ञानाच्या सह्याने कपडे धुलाईच्या क्षेत्रात क्रांतीकारी पाऊल टाकले. सर्व साधारणपणे हा व्यवसाय इतका अॅडव्हान्स तंत्रज्ञाने युक्त असू शकतो अशी कल्पना कुणी केली नसेल. परंतू नवनवीन गोष्टी तंत्रज्ञानाच्या कसोटीवर पडताळून पहाण्याच्या छंदाने अक्षय कलंत्री यांनी या व्यवसायात दमदार पाऊल टाकले.
द वॉशिंग झोन हे कपडे धुण्याचे दालन सुरू करतांना उत्तम दर्जा आणि विनम्र सेवा ही तत्वे जोपासली. पुर्णत: स्वयंचलित मशिनद्वारे कपडे हळुवारपणे धुऊन त्यानंतर प्रथम स्टिम प्रेस सारख्या आनोेख्या परंतू थोड्याशा महाग अशा प्रेसद्वारे हे कपडे इस्त्री करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. कपडे प्रथम अतिशय शुद्ध पाण्याने धुतले जातात. मशिनमध्ये योग्य त्या तापमानात सुकवले जातात. त्याचबरोबर कपडे धुण्यासाठी उच्च दर्जाची व पर्यावरणपुरक केमिकल्स वापरले जातात. त्यामुळे कपड्याच्या रंगावर व त्याच्या धाग्यावर कोणताही परिणाम होत नाही. कपड्याचा ताजेपणा वाढवून त्याचे आयुष्य वाढते. केवळ कपडेच नाही तर शुज, सॅन्डल्स, पर्स, सॉफ्ट टॉईज, स्ट्रोल बॅग, गालिचे, खिडक्यांचे पडदे, कार शिट कव्हर, बेडशिट व सतरंजीसारखे आनेक कपडे धुतले जातात. तसेच धुतलेले कपडे अकर्षक पॅकिंगमध्ये ग्राहकांना दिले जातात. त्यामुळे आपले कपडे कपाटात अनेक दिवसांपर्यंत ताजे तवाणे राहतात. या गुण वैशिष्ट्यांमुळे द वॉशिंग झोनला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
दोन वर्षांपूर्वी लावलेले रोपट्याचे आज वटवृक्ष होत आहे. सर्व सामान्य ग्राहकांबरोबरच शहरातील नामवंत उद्योजक डॉक्टर, इंजिनियर, व्यापारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर द वॉशिंग झोनचे केवळ ग्राहकच नाही तर चहाते आणि पाठराखे आहे. या दोन वर्षांच्या प्रवासात केवळ ग्राहकच नाही तर अनेकांचे प्रेम मिळाले. संगमनेरसह जिल्ह्यातील व नाशिक, औरंगाबाद येथील ग्राहकही द वॉशिंग झोनशी जोडले गेले आहे. शनिवार 22 जुलै रोजी द वॉशिंग झोन तिसर्या वर्षात पदार्पन करीत आहे. यानिमित्त आमच्या असंख्य ग्राहक, हितचिंतकांचे आम्ही आभारी आहोत…