
संगमनेर तालुक्यातील झोळे येथे सोमवार दि. 5 ऑगस्ट रोजी पडवीत झोपलेल्या एका 77 वर्षीय वृद्धाचा अज्ञात इसमांनी खून केला होता. हा खून कोणी व कशासाठी केला याचा कोणताही सबळ पुरावा घटनास्थळी मिळून आला नसल्याने या खूनाचे मोठे गूढ बनले होते. मात्र घटनास्थळी एक चिठ्ठी मिळाली होती. या चिठ्ठीच्या आधारे पोलीसांनी संगमनेर ते झारखंड असा प्रवास करत आवघ्या तीन दिवसात या खूनाची उकल करत आरोपीला गजाआड केले आहे. इंस्टाग्रामवर ओळख आणि ओळखीनंतर झालेले प्रेम तसेच मागितलेल्या खंडणीसाठी घडलेल्या प्रकरणातून या वृद्धाचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याचे संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. सदर आरोपी भूषण शांताराम वाळे (रा. झोळे, वय 23) यास आज गुरूवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले असून आरोपीने खूनाची कबूली दिली आहे.
इंस्टाग्राम मधून प्रेम आणि प्रेमासाठी वृध्दाचा खून
दिनांक 5/8/2024 रोजी झोळे गावातील साहेबराव उन्हवणे वय वर्ष 77 यांचा पहाटेच्या दरम्यान मृतदेह मिळून आला होता. मृतदेह त्यांच्या नेहमीच्या झोपण्याच्या ठिकाणी पलंगावर आढळून आलेला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या घटनास्थळ भेटीदरम्यान सदरचा मृत्यू हा घातपात असल्याचे दिसून येत होते.
त्यावरून सदरच्या प्रकरणात संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. घटनास्थळीच एक पेनाने लिहिलेली चिठ्ठी देखील मिळून आली होती व त्या चिट्ठी नुसार झारखंड मधील काही व्यक्तींनी खंडणी घेऊन हा खून केल्याचे नमूद केले होते.
सदरचे प्रकरण हे गंभीर असून उघड होण्याच्या दृष्टीने देखील गुंतागुंतीचे व आव्हानात्मक होते. गुन्ह्याच्या घटनास्थळी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे,पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी भेटी दिल्या होत्या.
सदर गुन्ह्याच्या तपासात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वाघचौरे यांनी तीन पथके तयार केली होती. संगमनेर तालुका पोलीस स्टेशन कडील पीएसआय सातपुते यांचे सोबत एक पथक,उपविभागीय पोलिस अधिकारी संगमनेर कार्यालयाकडील राहुल डोके राहुल सारबंदे यांचे एक पथक व स्थानिक गुन्हे शाखा नगर यांच्याकडील पीएसआय धाकराव यांचे सोबत एक पथक असे तीन पथके वेगवेगळ्या अंगाने गुन्ह्याचा तपास करत होते.
मृतक व्यक्तीच्या कुटुंबातील सर्व सदस्य, त्याचे मित्रपरिवार,त्यांचे नातेवाईक तपासणे,त्याचप्रमाणे घटनास्थळ परिसरावर जाणाऱ्या सर्व रस्त्यांची सीसीटीव्ही तपासणे, परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणे, घटनास्थळी मिळून आलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याप्रमाणे झारखंड मधील व्यक्तींचा तपास करणे इत्यादी विविध बाजूंवर सदरची पदके काम करत होती.चिट्ठीत नमूद असलेल्या झारखंड मधील व्यक्तींकडे केलेला तपास, चिठ्ठीत लिहिलेले अक्षर, झोळे ते संगमनेर दरम्यान महामार्गावरील संपूर्ण सीसीटीव्ही चा केलेला अभ्यास व मोबाईल चा आरोपीने अतिशय चलाखीने केलेल्या वापराचे विश्लेषण यावरून वरील पथकांनी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास करून यातील आरोपी उघड केला आहे.
व हा आरोपी भूषण कांताराम वाळे राहणार झोळे वय वर्ष 23 हा असून त्यास रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. त्याच बारकाईने विचारपूस करतात त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे.
आतापर्यंतच्या तपासात झारखंड येथे असलेल्या एका मुलीशी या आरोपीची इंस्टाग्राम वरून ओळख झाली होती ओळखीचे रूपांतर इंस्टाग्राम वरच प्रेमात झाले होते आणि हे इंस्टाग्राम वरील प्रेम टिकवण्यासाठी व पुढे नेण्यासाठी या आरोपीने हा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.
आरोपीला आणखी कोणी स्थानिकांनी मदत केली आहे किंवा कसे? गुन्ह्यात अन्य कोणी साथीदार आहे काय याबाबत पुढील तपास सुरू आहे.
या आरोपीवर यापूर्वी देखील 2 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक गुन्हा हा गुन्हा रजिस्टर क्रमांक 164/2018 कलम 302, 363 ipc हा खुनाचा गुन्हा असून दुसरा गुन्हा हा गुन्हा रजिस्टर क्रमांक 13/2024 कलम 379 हा गुन्हा गायी चोरीचा आहे.
सदरचा गुन्हा उघड होने कामी विशेष पोलीस महानिरीक्षक मा. दत्तात्रय कराळे,जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलूबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांचे मार्गदर्शन लाभले.
गुन्हा तपासात व उघड आणण्यात पीएसआय सातपुते, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन, पीएसआय धाकराव स्थानिक गुन्हे शाखा, राहुल सारबंदे राहुल डोके उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर, तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडील
Psi तुषार धाकराव,पो कॉ/ सागर ससाणे,पो का /अमृत आढाव तसेच सायबर सेल कडील, पोलीस कॉन्स्टेबल सचिन धनाड,पो का प्रशांत राठोड, पो का/प्रमोद जाधव यांचा सहभाग होता.
सध्या या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे,
पोलीस उपनिरीक्षक इस्माईल शेख,पोलीस हवालदार शिवाजी डमाळे,पोलीस हवालदार अमित महाजन,पोलीस हवालदार सहाणे
पोलीस शिपाई बाबासाहेब शिरसाट,पोलीस शिपाई सचिन सोनवणे सर्व नेमणूक संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हे करत आहे…