एकच मिशन जुनी पेन्शनकर्मचाऱ्यांचे तीव्र निदर्शने

संगमनेर (दैनिक युवावार्ता)
संगमनेर – शासन शासकीय कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत त्यातही जुन्या पेन्शनबाबत कायम उदासीन धोरण घेत आहे. अनेक वर्षे जुनी मागणी असतांना जुन्या पेन्शनबाबत निर्णय होत नसल्याने आज ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक यांनी पंचायत समिती संगमनेर येथे तीव्र आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले.
जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने पुकारलेल्या एक दिवशीय धरणे आंदोलन आणि तीव्र स्वरूपाचे निषेध व्यक्त करणे याकरिता आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी क्रांतीदिनी पंचायत समिती संगमनेर येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. ग्रामसेवकांचे नेते एकनाथराव ढाकणे व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष सुनील नागरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपाचे निदर्शने करण्यात आली.

एकच मिशन जुनी पेन्शन बाबत सरकारचे धोरण, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची भूमिका विशद करून सरकारने तात्काळ सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन सरसकट लागू करावी. तसेच 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेले परंतु 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात अथवा अधिसूचना निघालेली कर्मचारी, अधिकारी यांना सदर योजना महाराष्ट्र शासनाने लागू केलेली आहे. ती पूर्वलक्षी प्रभावाने जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना तात्काळ लागू करावी. असा आदेश निर्गमित व्हावा व अन्य प्रमुख मागण्या करिता तीव्र स्वरूपाचे निदर्शना करून सरकारने वेळ काढूपणाचे जे काही धोरण चालू आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. भविष्यात जर सरकारने राज्य सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी, ग्रामसेवक संवर्गाचे प्रश्‍न तातडीने न सोडवण्यास नजीकच्या काळात बेमुदत संप अटळ आहे. याबाबत सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी व कर्मचार्‍यांच्या न्याय प्रश्‍नांची तात्काळ सोडवणूक करावी अशी मागणी श्री. ढाकणे यांनी सांगितले. याप्रसंगी कर्मचारी, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकच मिशन जुनी पेन्शनच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. आंदोलन यशस्वी केल्याबद्दल राज्य विभागीय उपाध्यक्ष सुनील नागरे यांनी आभार मानून तीव्र स्वरूपाच्या निदर्शनाची सांगता झाली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख