
अकस्मात निधनाने घुलेवाडीसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत
संगमनेर
संगमनेर पंचायत समितीच्या माजी सभापती व काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुनंदाताई बाळासाहेब जोर्वेकर यांचे आज शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या 55 वर्षांच्या होत्या. त्यांच्या अकस्मात निधनाने घुलेवाडीसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
कै. सुनंदाताई बाळासाहेब जोर्वेकर यांनी आपल्या पहिल्याच टर्म मध्ये अडीच वर्षे सदस्य व सन २०२० ते २०२३ या कालावधीत अडीच वर्षे संगमनेर पंचायत समिती सभापती म्हणून चांगले काम केले होते. या कालावधीत माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक शासकीय योजना चांगल्या प्रकारे तालुक्यात राबविल्या. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर नाशिक येथील अशोका रुग्णालयात उपचार सुरू होते. आज याठिकाणी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती बाळासाहेब जोर्वेकर, मुलगा विजय व प्रमोद, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्यावर आज शनिवारी सायंकाळी 7.30 वाजता घुलेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने कै. सुनंदाताई बाळासाहेब जोर्वेकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली.