संगमनेरमध्ये प्रथमच हेअर ट्रान्सप्लान्ट सर्जरी यशस्वी
संगमनेर
‘सर सलामत तो पगडी पचास’ ही म्हण आपण अनेक वर्षांपासून ऐकत आहोत. सध्याच्या काळात मात्र ‘ बाल सलामत तो पगडी पचास ‘ असंच म्हणावं लागेल. आजच्या प्रेझेंटेशनच्या युगात व्यक्तिमत्वाला विशेष महत्त्व आहे. व्यक्तीमत्वाचा विकास करताना आपल्या केसांनाही अनन्यसाधारण महत्व आले आहे. जीवनातील काॅलेज लाईफ, करिअर, विवाह अशा महत्वाच्या टप्यांवर अनेकांना याचा अनुभव आला असेल.
लांब केस हे महिलांचे आभूषण असले तरी पुरुषांचेही व्यक्तीमत्व त्याच्या केसांमुळे फुलून दिसते. परंतु अकाली केस गळतीमुळे किंवा अनुवांशिक व अन्य काही कारणांमुळे अनेक युवकांना निराशा येते. या निराशेवर मात करण्यासाठी अनेक तरुणांना आता ‘हेअर ट्रान्सप्लान्ट’ सर्जरीचा पर्याय योग्य वाटू लागला आहे. यासाठी अनेक जण मुंबई-पुण्यासारख्या शहरांत जाऊन महागडी ट्रान्सप्लान्ट सर्जरी करून घेतात. मात्र आता येथील तरुणांना बाहेर कुठेही जाण्याची गरज पडणार नाही कारण ती सुविधा आपल्या संगमनेरमध्ये उपलब्ध झाली आहे.
संगमनेरमध्ये ‘दात वाचवणारे डॉक्टर’ या टॅगलाईनमुळे प्रसिद्ध असलेल्या xpert dental clinic नवीन नगर रोड, ताजणे मळा येथे ही सुविधा उपलब्ध झाली आहे. या ठिकाणी ‘curv dent hair & face clinic’ च्या माध्यमातून आता संगमनेरकरांना चेहरा व केसांसाठीच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया व सौंदर्यवर्धक योग्य उपचार (esthetic treatment) घेऊन आलो आहोत असे xpert डेंटल क्लिनिक डॉ.सागर गोपाळे यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.
या ‘Curv dent hair & face क्लिनिक’ च्या माध्यमातून संगमनेरमध्ये प्रथमच हेअर ट्रान्सप्लान्ट सर्जरी यशस्वीपणे पार पडली आहे. कानवडे हॉस्पिटलच्या सहकाऱ्याने हि सर्जरी यशस्वी करण्यात आली. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. मिसबाह फरहीन ( oral maxillofacial surgeon) यांचे सहकार्य लाभले.
अनेकदा कितीही औषधं घेतली तरी चेहऱ्यावरील काही डाग किंवा सुरकुत्या जात नाहीत. अनेकांच्या चेहऱ्यावर अगदी नाजूक शस्त्रक्रिया करून सौंदर्य वाढवता येते तेही कमी वेळात व कायमस्वरूपी. अशा अनेक प्रकारच्या सुविधा आता संगमनेकरांना उपलब्ध करून देत आहोत असे स्माईल कोच डॉ. सागर गोपाळे यांनी सांगितले. पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरात होणाऱ्या शस्त्रक्रिया आता आपल्या संगमनेरात सारख्या शहरात उपलब्ध होणार असल्याने त्याचा मोठा लाभ येथील तरुणांना होऊन संगमनेरकरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम एक्सपर्ट डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून होणार आहे.