नगरपरिषदेचा ठराव मंजूर; महाराष्ट्र दिनी अकोले बायपासवरील चौकाला नवे नाव

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील अकोले बायपास रोडवरील क्रिडा संकुल ते मेडीकव्हर हॉस्पिटल चौकाला विश्वनिर्माता श्री विश्वकर्मा चौक नाव देण्याचा निर्णय संगमनेर नगरपरिषदेने घेतला होता. त्यानूसार हा नामकरण सोहळा एक मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
संगमनेरमध्ये विश्वनिर्माता विश्वकर्मा यांच्या नावाने यथोचित स्मारक किंवा एखाद्या महत्त्वाच्या चौकाला नाव देण्यात यावे अशी मागणी विश्वकर्मा सुतार समाज ट्रस्टच्यावतीने नगरपालिकेकडे करण्यात आली होती.

त्यानुसार आ. सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी पुढाकार घेत त्यास नगरपालिका बैठकीत ठराव घेऊन 27 मार्च 2026 रोजी मंजुरी दिली. त्यानुसार नवीन अकोले बायपास रोडवरील मेडीकव्हर हॉस्पिटलकडे जाणार्या रस्त्याला श्री विश्वकर्मा चौक असे नाव देण्यात येणार आहे. तशी तयारी देखील या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. आ. सत्यजित तांबे यांच्यासह विश्वकर्मा सुतार समाज ट्रस्टच्या पदाधिकार्यांनी या जागेची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या. एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या चौकाचे नामकरण करण्यात येणार आहे. या नामकरणासाठी ऍड. राजू खरे, देवीदास गोरे, विजय सुर्यवंशी, रमेश राजगुरू, किरण वाकचौरे, संपत सुर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुढाकार घेतला.






















