शिवसेना महायुतीचे बस स्थानकावर निदर्शने

0
89

महिलांचा हक्क नाकारणाऱ्या इंडिया आघाडीचा केला निषेध

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – लोकसभेमध्ये मोदी सरकारकडून मांडण्यात आलेल्या नारीशक्ती विधेयकाला काँग्रेससह इंडिया आघाडीच्या पक्षांनी विरोध केल्याने हे विधेयक पारित होऊ शकले नाही. त्यामुळे 33 टक्के महिलांना संसदेत जाण्याचा मार्ग बंद झाला. याच्या निषेधार्थ संगमनेर येथे शहर महिला शिवसेना महायुतीच्या वतीने तीव्र आंदोलन करून इंडिया आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या विरोधात महिलांनी जोरदार घोषणा बाजी करत बस स्थानक परिसर दणाणून सोडला होता. संगमनेर शहर महिला शिवसेना महायुतीच्यावतीने बसस्थानक परिसरात महिला एकत्र आल्या. या वेळी आंदोलनकर्त्या महिलांनी हातात फलक घेऊन नारीशक्तीचा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही, महिलांच्या हक्कांसाठी लढा देऊ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे नारी शक्ती वंदन (महिला विधेयक) असून, त्याला विरोध करणे म्हणजे महिलांच्या प्रगतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी तसेच संगीता पुंड यांनी करत देशातील महिलांना राजकीय व सामाजिक स्तरावर अधिक संधी मिळाव्यात, यासाठी नारीशक्ती विधेयक अत्यावश्यक आहे. मात्र काँग्रेससह इंडिया आघाडीच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून या विधेयकाला विरोध होत असल्याने विधेयकाला विरोध करणार्‍यांचा यावेळी निषेध करण्यात आला.


यावेळी लीलावती काळे, सोनाली बोटवे, पुनम दायमा, संगीता पुंड, सपना जाधव, पूजा आरगडे, आरती पगारे, शोभा सूर्यवंशी, राधा सूर्यवंशी, अरुणा सूर्यवंशी, कोमल सातपुते, स्वाती मंंडलिक, शिवाली सूर्यवंशी, दिपाली वाव्हळ, शिवज्ञा आरगडे, जान्हवी जांबुकर यांच्यासह अनेक महिला व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here