‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे रविवारी सामूहिक वाचन

0
240

शिंदे सेनेचे आ. गायकवाड यांच्या शिवराळ भाषेच्या निषेधार्थ आंदोलन

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केले. संगमनेर मधील सर्व राजकीय पक्ष व पुरोगामी संघटना यांच्या वतीने रविवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत नेहरू गार्डन संगमनेर येथे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे.


छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड समाजातील सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या मावळ्यांमध्ये विविध जाती धर्मातील व मुस्लिम समाजातील
अनेक कर्तबगार पुरुष होते. या सर्वांची माहिती असणारे व कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेले शिवाजी कोण होता? हे पुस्तक महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. मात्र अपूर्ण माहितीच्या आधारे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाबाबत वाद निर्माण केला असून प्रकाशकाला अत्यंत घाणेरडी भाषा वापरली आहे. यामुळे महाराष्ट्रात आणि समाजात त्यांच्याविषयी मोठा असंतोष निर्माण झाला आहे.


समाजामध्ये तेढ निर्माण करणार्‍या संजय गायकवाड यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ संगमनेरमधील सर्व राजकीय पक्ष व पुरोगामी संघटना यांच्या वतीने 10 वाजता संगमनेर बस स्थानक येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. या सामूहिक पुस्तक वाचन कार्यक्रम व संजय गायकवाड यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ संगमनेरमधील सर्व राजकीय पक्ष, पुरोगामी व समाजसेवी संघटना, युवक संघटना, महिला संघटना, पदाधिकारी कार्यकर्ते पुरोगामी संघटना यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कायम वादग्रस्त वक्तव्य करणारा.. गरीबांना मारझोड करणारा… इतिहासाचे काडीमात्र ज्ञान नसणारा… परंतु स्वराज्यनिष्ठ राजे शिर्के घराण्याला खलनायक म्हणत गरळ ओकणारा… वाचाळ बोलणारा… उद्धट वागणारा.. गुंड प्रवृत्तीच्या आमदाराचा तीव्र जाहिर निषेध. तसेच जागतिक पुस्तक दिनानिमित्त लेखक शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा अवमान करून पुस्तक प्रकाशक यांना धमकी दिल्याबद्दल तसेच ‘शिवाजी कोण होता’? या पुस्तकाबाबत अपशब्द वापरत थेट छत्रपती शिवरायांचाही अवमान करणार्‍या नालायक मूर्ख अनपड संजय गायकवाड वर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी.

लक्ष्मीकांत राजे शिर्के ( प्रवक्ता, शंभुसेना )
( पत्रकार व इतिहास अभ्यासक )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here