अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या प्रा. सचिन ठाणेकर यांना पीएचडी प्रदान

डॉ. ठाणेकर यांनी १ पेटंट,१ कॉपीराईट, ८ स्कोपस, ५ कॉन्फरन्स मध्ये शोधनिबंध प्रकाशित केले आहे

संगमनेर (प्रतिनिधी)- अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागातील प्राध्यापक सचिन अरुण ठाणेकर यांना कोनेरू लक्ष्मीः विद्यापीठाने कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग क्षेत्रात पीएचडी प्रदान केली. डॉ. ठाणेकर यांनी “ईफ्फेक्टीव जॉब एक्जुकेषण इन हाडूप ओवर औथोराईज डीदुप्लीकेषन डेटा” या विषयावर प्रबंध सादर केला. डॉ. ठाणेकर यांनी डेटाच्या अधिकृत डुप्लिकेशनवर हडूपमध्ये प्रभावी कामाची अंमलबजावणी तंत्रज्ञान शोधण्याचे काम ह्या शोधनिबंध तून केले आहे. डॉ. ठाणेकर यांनी १ पेटंट,१ कॉपीराईट, ८ स्कोपस, ५ कॉन्फरन्स मध्ये शोधनिबंध प्रकाशित केले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश यांनी दिली.

या शोधनिबंधाचा जॉब मेटाडेटा जतन करून गणनेचा वेळ वाचतो. प्रयोगात्मक निकाल दाखवा की जॉबच्या अंमलबजावणीच्या वेळेत सुधारणा झाली आहे, स्टोरेज जागा कमी झाली आहे, अशा सुलभ प्रणालीची रचना केली. त्यांना डॉ. के. सुब्रमण्यम (प्राध्यापक, सी.एस.ई विभाग, के.एल. विद्यापीठ) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. ए.बी. बागवान ( प्राध्यापक, एस. सी. ओ. ई, पुणे ) यांचे मार्गदर्शन लाभले.
पीएचडी प्रदान झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष राज्याचे माजी महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात , विश्वस्त आ. डॉ. सुधीरजी तांबे , विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे ,डायरेक्टर अकॅडेमिक्स डॉ. जे. बी. गुरव , प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, रजिस्ट्रार प्रा. व्ही.पी. वाघे आणि संगणक विभाग प्रमुख डॉ. एस.के.सोनकर व सर्व शिक्षक – विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख