अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या प्रा. सुजित वाकचौरे यांना पीएच. डी. प्रदान

डॉ. वाकचौरे  यांच्या नावे १ पेटंट , ४ स्कोपस, ३ कोन्फेरन्समध्ये शोधनिबंध प्रकाशित

संगमनेर (प्रतिनिधी)- अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागातील प्राध्यापक सुजित ऋषीकांत वाकचौरे यांना डॉ.ए पी जे अब्दुल कलाम विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग क्षेत्रात पीएचडी प्रदान केली. डॉ. वाकचौरे  यांनी “ए पॅटर्न ग्रोथ बेस्ड टाइम ईफीशिएंट टेकनिक फॉर मायनिंग ऑंल सिकवेन्शिअल पॅटर्न फ्रॉम ए बिग डेटा सेट” या विषयावर प्रबंध सादर केला. डॉ. वाकचौरे  यांनी मोठ्या डेटा संचातून सर्व अनुक्रमिक नमुने मायनिंग करण्यासाठी वेळ आणि मेमरी स्पेस कार्यक्षम तंत्रज्ञान शोधण्याचे काम ह्या शोधनिबंध तून केले आहे. डॉ. वाकचौरे  यांनी १ पेटंट , ४ स्कोपस, ३ कोन्फेरन्स मध्ये शोधनिबंध प्रकाशित केले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश यांनी दिली.

या शोधनिबंधाचा उद्देश मोठ्या डेटा सेटमधून अनुक्रमित येणारे नियम अचूकपणे एक्स्ट्रॅक्ट करणे हा होता आणि हे लक्षात घेऊन त्यासाठी बनवलेल्या अल्गोरिदम च्या साहाय्याने त्यासाठी लागणारा वेळ आणि मेमरी कमी करणे अशा सुलभ प्रणालीची रचना केली. त्यांना डॉ. राजीव विश्वकर्मा (उप कुलगुरू, डॉ.ए पी जे अब्दुल कलाम विद्यापीठ) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. संतोष पवार यांचे मार्गदर्शन लाभले. पीएचडी प्रदान झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष राज्याचे माजी महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात , विश्वस्त आ. डॉ. सुधीरजी तांबे , विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे ,डायरेक्टर अकॅडेमिक्स डॉ. जे. बी. गुरव , प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, रजिस्ट्रार प्रा. व्ही.पी. वाघे आणि संगणक विभाग प्रमुख डॉ. एस.के.सोनकर व सर्व शिक्षक – विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख