दुर्गवैभव सचित्र पुस्तकाचा रविवारी प्रकाशन सोहळा

0
1594

अनेक वर्षांतील भटकंतीतून शाेधलेल्या बारकाव्यांचे उत्तम रेखाटन

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – गीता परिवाराचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत कासट यांच्या चाळीस वर्षांच्या दुर्ग भ्रमंतीतून साकारलेल्या दुर्गवैभव महाराष्ट्राचे या सचित्र पुस्तकाचा प्रकाशन समारंभ उद्या रविवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी येथील मालपाणी लॉन्स येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली.


श्रीकांत कासट यांनी गीता परिवाराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यांची भटकंती केली आहे. भटकंती करतांना तेथील अनेक बारकावे शोधत त्यांनी दुर्गवैभव या पुस्तकात ते रेखाटले आहे. प्रसिद्ध साहित्यीक विश्वास पाटील, सुप्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे , माजी आमदार डॉ, सुधीरजी तांबे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सहाय्यक सचिव डॉ. ओमप्रकाश शेटे, उद्योजक मनिष मालपाणी, इ.वि.का. राजवाडे संशोधन मंडळाचे संजय मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन होते आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गीता परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here