गद्दाराला नको तर निष्ठावंतालाच उमेदवारी द्यावी

0
1785

उत्तर नगर जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एकमुखी मागणी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर-
शिवसेनेत घडलेल्या घडामोडीनंतर मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिंदे गटात उडी घेतल्याने शिर्डी मतदारसंघात शिवसेनेला नव्याने उमेदवार शोधावा लागला. आणि याच संधीचा फायदा घेत ऐनवेळी शिवसेनेशी गद्दारी केलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेत आपल्याला पुन्हा एकदा पक्षात घेण्याची विनंती केली. मात्र इकडे शिवसेनेशी गद्दारी करणार्‍यांना पुन्हा संधी नको, आता फक्त निष्ठावंतच उमेदवार पाहिजे अशी मागणी करत उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्‍यांनी संगमनेर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी 3 तास बैठक घेत वाकचौरे यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाला व उमेदवारीला प्रखर विरोध केला.


संगमनेर येथे झालेल्या बैठकीसाठी शिवसेना उत्तर नगर जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे व मुजीब शेख तसेच माजी आमदार भाऊसाहेब कांबळे तसेच संगमनेर, शिर्डी, कोपरगाव श्रीरामपूर, अकोले तालुक्यातील विद्यमान पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये विधानसभा व लोकसभेमध्ये शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून उद्धव साहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वच पदाधिकार्‍यांनी गद्दार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रवेशाबाबत तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करीत आपला रोष व्यक्त केला. तसेच लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर सर्व पदाधिकारी आपली व्यथा मांडणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गद्दार भाऊसाहेब वाकचौरे यांचा प्रवेश देऊ नये यासाठी आग्रह करुन विनंती करणार आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांनी केलेल्या गद्दारीचा पाढाच शिवसैनिक व पदाधिकार्‍यांनी वाचून दाखवला.

slh


त्याचप्रमाणे लोकसभेत दोनदा व विधानसभेत एकदा पराभूत झालेल्या, डिपॉझिट जप्त झालेल्या व्यक्तीला, शिर्डीच्या साईबाबाची खोटी शपथ घेऊन साईबाबाला फसवणार्‍या, शिर्डी लोकसभेतील जनतेला फसवणार्‍या व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना फसवणार्‍या, शिवसैनिकांना फसवणार्‍या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेत प्रवेश मिळू नये यासाठी सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने उद्धव ठाकरे यांच्याकडू मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शिवसेने सह शिवसेनेच्या अंगीकृत असलेल्या शिवसेना महिला आघाडी, अपंग सहाय्यसेना, ग्राहक संरक्षण कक्ष, व्यापारी आघाडी, रिक्षा सेना व युवा सेनेचे अशा संघटनांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

kajale


शिवसेना पक्षातून 40 गद्दार निघून गेले. त्यांनी एकदा गद्दारी केली परंतु भाऊसाहेब वाकचौरेने शिवसेना पक्षाबरोबर तीन वेळा गद्दारी केली आहे. यामुळे अशा गद्दार व संधीसाधू व्यक्तिला कोणत्याही परिस्थितीत शिवसेना पक्षात घेऊ नये ही शिवसैनिकांची तळमळ आहे. शिवसैनिकांचे म्हणणे ऐकल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत वाकचौरे यांना पक्ष प्रवेश देऊ नये. तसेच नगर दक्षिणेतील काही नाराज मंडळींनी उत्तर नगर जिल्ह्यातील काही नाराज व्यक्तींना हाताशी धरून हा खटाटोप सुरू करून राजकीय ढवळाढवळ सुरू केलेली आहे. नगर जिल्ह्यातील त्या पदाधिकार्‍यांना उत्तर नगर जिल्ह्याच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की, आपण दिल्या घरी सुखी राहावे. उत्तर नगर जिल्ह्यात कोणताही खटाटोप करू नये. उत्तर नगर जिल्ह्याची शिवसेना अतिशय चांगल्या प्रकारे स्वाभिमानाने काम करत असून तुमच्यासारखे शेजारच्या पाटलांच्या तालावर नाचणे आम्हाला शक्य नसून व येणार्‍या काळात शिवसेना पक्षाच्या प्रामाणिक शिवसैनिकालाच उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने निवडून आणणार आहे. उत्तर नगर मधील शिवसैनिक शिर्डी लोकसभा मतदार संघातील जनता ही नेहमीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विचाराच्या उमेदवारालाच निवडून देत आहे. यावेळेस शिर्डी लोकसभेतून सुद्धा प्रामाणिक शिवसैनिकालाच शिर्डी लोकसभेतील जनता निवडून देईल, त्यामुळे इतरांनी नाक खुपसण्याचे काम करू नये अशा सूचना वजा इशारा उत्तर नगर जिल्ह्यातील सर्वच पदाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आली.

Mohit-Computer-New-Add-1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here