जागतिक दर्जाचे योगतज्ञ डॉ. सुधाकर पेटकर यांच्या जीवनकहाणीवर आधारित ‘चंदनाचे हात’
योगवर्धिनी व संगमनेर साहित्य परिषदद्वारा साेहळ्याचे आयाेजन
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – प्रसिद्ध योगतज्ञ डॉ. सुधाकर पेटकर यांच्या कृतार्थ जीवनकहाणीवर आधारित चंदनाचे हात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.00 वाजता कृष्णा गार्डन, संगमनेर येथे विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. योगवर्धिनी व संगमनेर साहित्य परिषद द्वारा आयोजित या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
डॉ. सुधाकर पेटकर हे जागतिक दर्जाचे योगतज्ञ आहेत. मात्र यासाठी त्यांनी आयुष्यात मोठा संघर्ष केला आहे. या संघर्षाची गाथा सांगणारे चंदनाचे हात हे पुस्तक वाचकांच्या सेवेत दाखल होत आहे.
या पुस्तकाचे प्रकाश माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होत असून यावेळी माजी आ. डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, दैनिक युवावार्ताचे संस्थापक किसन भाऊ हासे, ज्येष्ठ लेखक व पत्रकार शांताराम गजे यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी अभिनेते व गीतकार बाबासाहेब सौदागर तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार विजेत्या सौ. निलिमा पेटकर (क्षत्रिय) यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. सौ. अलका पेटकर, डॉ. रितू पेटकर, डॉ. हर्षल पेटकर, डॉ. वसुंधरा पेटकर, अरविंद गाडेकर आदिंनी केले आहे.