घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात डायलीसिस सेंटर सुरु

0
1566

संगमनेर प्रतिनिधी –
ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशा रुग्णांनी महागड्या हॉस्पिटलमध्ये किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये डायलेसिस किंवा सोनोग्राफीसाठी न जाता, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात सुरू झालेल्या डायलेसिस आणि सोनोग्राफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. अमोल खताळ यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने उपलब्ध झालेल्या डायलेसिस आणि गरोदर महिला सोनोग्राफी युनिटचा लोकार्पण सोहळा आ. अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी अहिल्यानगरचे जिल्हा शल्यचिकित्सक नागोराव चव्हाण, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक राजकुमार जर्‍हाड, वैद्यकीय अधिकारी संदीप कचेरीया, डॉ. राजश्री घोडके, लेक लाडकी अभियानाचे जिल्हा समन्वयक गणेश बोर्‍हाडे, विनोद सूर्यवंशी, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, शरद पानसरे, निवृत्ती पानसरे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व घुलेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, संगमनेर व परिसरात मोठ्या प्रमाणात किडनीग्रस्त रुग्ण आहेत. त्या रुग्णांना डायलेसिस करण्यासाठी अत्यंत महागड्या हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते. त्यासाठी आपण आरोग्यमंत्रींकडे पाठपुरावा केला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार, आरोग्यमंत्री आबीटकर आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस आणि गरोदर महिलांसाठी सोनोग्राफी मशीन सुरू झाले आहे. त्याचा आर्थिक परिस्थिती नसलेल्या गोरगरीब रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आ. खताळ यांनी केले आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक चव्हाण म्हणाले की, रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाला सौजन्याची वागणूक द्या. त्यामुळे त्या रुग्णाचा निम्मा आजार बरा होतो. त्यामुळे प्रत्येक कर्मचार्‍यांनी रुग्णालयात आलेल्या रुग्णाशी सौजन्याने बोला, असा सल्ला त्यांनी दिला. येथून मागील काळात डायलेसिस करण्यासाठी पुणे, मुंबई, यासारख्या मोठ्या शहरांमध्ये रुग्णांना जावे लागत होते. मात्र ग्रामीण रुग्णालयात गरोदर महिलांसाठी संगमनेर, अकोले आणि सिन्नर या तालुक्यातील गोरगरीब रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक चव्हाण यांनी केले. वैद्यकीय सेवेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल आ. खताळ यांच्या हस्ते डायलेसिस विभागाच्या कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here